महाराष्ट्र 9

महाविद्यालयीन तरुण – तरुणीचा भरदिवसा स्प्रे मारून चोरी करण्याचा प्रयत्न फसला,चोपडा येथील साई विहार अपार्टमेंट मधील घटना

[espro-slider id=13780]

महाविद्यालयीन  तरुण तरुणीचा भरदिवसा स्प्रे मारून चोरीचा प्रयत्न फसला

जुना शिरपूर रोडवरील साईविहार अपारमेंट येथील घटना

चोपडा:-प्रतिनीधी-(सचिन जयस्वाल)
शहरातील जुन्या चोपडा शिरपूर रस्त्यावरील महावीर सुपर शॉप समोरील साई विहार अपारमेन्ट मधील घरात घुसून महाविद्यालयिन तरुण तरुणी यांनी घरातील महिलेच्या तोंडावर मिरची स्प्रे  मारून धक्का बुक्की करत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली .
यावेळी घरात कामकाज करणाऱ्या महिलेने आरडाओरड करण्याने शेजाऱ्यांनी पळून जाणाच्या तयारीत असलेल्या तरुण तरुणीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले .या घटनेने शहरात मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या शिरपूर रस्त्यावरील शिव कॉलोनीतील महावीर सुपर शॉप समोरील अपारमेंट मध्ये तिसऱ्या मजल्यावर सहा नंबरच्या फ्लॅट मध्ये दिया गॅस एजन्सीचे मालक नितीन रामभाऊ पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात त्यांच्या अमळनेर तालुक्यात शैक्षणिक संस्था आहेत. गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक बावीस वर्षीय तरुण शाळेच्या कामानिमित्त आलो आहेत आबा(नितीन पाटील यांना आबा म्हणतात) आहेत का?अशी विचारणा त्याने घरी असलेल्या वैशाली पाटील यांच्या कडे केली . ते घरी नाहीत कामानिमित्त बाहेर आहेत असे वैशाली पाटील यांनी सांगितले.
नंतर थोड्याच वेळात एक महाविद्यालयीन तरुणीने दरवाजा ठोठावला वैशाली पाटील यांनी दरवाजा उघडला समोर एक वीस वर्षीय तरुणी होती ,आपले एचडीएफसी बँकेत खाते आहे का?त्यावर वैशाली पाटील यांनी होकार दिला वैशाली पाटील यांनी होकार देऊन तीला घरात घेतलं सोप्यावर बसण्यास सांगितले.यावेळी अनोळखी तरुणी तोंडावरील स्कार्फ काढत असतांना दरवाज्याकडे बघत कोणाला तरी घरात येण्याचा इशारा केलाचे लक्षात आले असता वैशाली पाटील दरवाज्याकडे जात असताना त्यांना दुपारी तीन वाजता आलेला तोच तरुण तोंडावर अर्धवट रुमाल बांधलेला दिसला पर्यंत घरात असलेल्या तरुणीने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने वैशाली पाटील यांच्या तोंडावर मिरची स्प्रे मारला दरवाज्यातून आलेल्या मुलाने देखील खिशातून मिरची स्प्रे वैशाली पाटील यांच्या चेहऱ्यावर मारला हे घडत असताना ते चोर चोर असे ओरडत होत्या व त्यांनी चोरट्यांनी कॉलर आपल्या हातात पकडली असतांना त्यांनी वैशाली पाटील यांना मारहाण केली .या झटापटीत वैशाली पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची मण्याची माल तुटून पडली आहे.यावेळी आईने केलेली आरडाओरडा पाहून घरात असलेला मुलगा प्रणित व घरात काम करणारी महिला लताबाई पाटील धावत येऊन त्यांनी चोरट्यांना लाथाबुक्या मारल्या व सुटका करण्याचा प्रयत्न केला.हे करीत असताना तरुणीने लताबाई ला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या तावडीत न सापडता लताबाई नि मागच्या गॅलरीतून जाऊन खिडकीतुन रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या कडे मदतीची याचना केली ,आरोळ्या दिल्या .यावेळी अनोळखी तरुण तरुणी पळ काढत अपारमेन्टचा जिना उतरत मोटरसायकल ने धूम ठोकणार असतांना खाली उभे असलेल्या महेश (भैय्या)पवार,गोपाल महाजन तसेच खाली उभे असलेल्या लोकांनी त्यांना शिताफीने पकडून पोलीस स्टेशनला फोन लावून घटनेची खबर दिली चोरीसाठी पूर्वनियोजित प्लॅन: घटनांतर वैशाली पाटील यांना चोपड़ा उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर त्यानी संशयीत गिरीश सपकाळे याला ओळखले. कारण गिरीश हा दुपारी ३ वाजता अगोदर येऊन नितीन पाटील याच्याविपयी चौकशी करून गेला होता. तसेच वैशाली पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी गिरीश रवींद्र सपकाळे (रा आहुजा नगर जळगाव) गायत्री हेमंत कोळी (रा गायत्री नगर जळगाव) यांच्या विरुद्ध भाग ५ गु र न १७३/२०१९ भा द वि कलम ३९३ ,४५२,३२३,४२७,३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास उपनिरीक्षक स्वप्निल उनवणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]