महाराष्ट्र 9

अडावद येथे शेतात चालणाऱ्या जुगार अड्यावर पोलिसांचा छापा..
#३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…

[espro-slider id=13780]

अडावद येथे शेतात चालणाऱ्या जुगार अड्यावर पोलिसांचा छापा..
३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :–


१७ रोजी मध्यरात्री शेतात चालणाऱ्या जुगार अड्डयावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून यामुळे जुगाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


सुत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील अडावद येथील अलीम अली जहुर अली काझी यांच्या शेतात अवैधरित्या जुगार सुरु असल्याची माहिती अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे हे आठ दिवस रजेवर गेले असल्याने जळगाव नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मोताळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अलीम अली जहूर अली काझी यांच्या शेतात अनेक वर्षांपासून पत्त्यांच्या क्लब सुरू असल्याने या क्लबवर मोताळे यांनी त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांसह दि. १७ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शेतात जाऊन पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली असता, चार मोटार सायकलीसह रोख रकमेसह तीन लाख ७१हजार ६३० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


त्यात एक लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम जमा करण्यात आल्याचे समजते. अलीम अली जहुर अली काझी, भाऊसाहेब प्रकाश पाटील, विनोद भगवान पाटील, दीपक रघुनाथ जोशी, जुनेद शेख फिरोज, रामचंद्र रुपचंद्र महाजन ,अरुण वामन पाटील, इक्बाल शहा मोसा शहा ,लीलाधर कैलास साळुंके, रमाकांत विठ्ठल डोळे, भरत शालिक भिल जिगर सुरेश कोळी, प्रवीण धुडकू महाजन, यांच्यावर अडावद पोलीस ठाण्यात १६४ / २२ कलम महाराष्ट्र जुगार अधिनियमन कलम महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो ना शरीफ तडवी हे करीत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]