बुलढाणा अर्बन बँकेने सकारात्मक भूमिका घेतल्यास चोसाका लवकर सुरू होणार… चोसाका चेअरमन अतुल ठाकरे …

चोपडा प्रतिनिधी :–
बुलढाणा अर्बनची चोसाकाकडे असलेली थकबाकी ‘वन टाईम सेटलमेंटमेंट’ करण्यासाठी गेल्या आठवड्यात नेत्यांनी बुलढाणा येथे जाऊन चर्चा केली होती. ती सेंटलमेंट झाली तर बारामती ऍग्रो हा कारखाना चालवण्यास तयार असणार आहे. त्या अनुषंगाने चोपड्यात बैठक पार पडली. यावरही लवकरच तोडगा काढला जाईल, अशी आशा बैठकीत व्यक्त करण्यात आली.
चोपडा शेतकरी सहकारी कारखाना सुरु होण्याची गणिते अर्थ कारणावर अवलंबून आहेत. यातून शंभर टक्के मार्ग काढण्याची सगळ्यांची तळमळ आहे. यात शेतकरी, कामगार, संचालक मंडळ यांचे सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. असे झाल्यास कारखाना शंभर टक्के सुरू होऊ शकतो.

हा शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगला निर्णय होईल, असे मत बारामती अँग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. २३ रोजी ११ वाजता ओमशांती नागरी सहकारी पतपेढीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बारामती ॲग्रोचे व्हाइस चेअरमन सुभाष गुळवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, भाजप नेते घनश्याम अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे, उपाध्यक्ष शशिकांत देवरे, माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील ओम शांती नागरी सहकारी पतपेढीच्या सभागृहात बैठकिस हजर होते .

या बैठकीस बारामती ॲग्रोचे व्हाइस चेअरमन सुभाष गुळवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, भाजप नेते घनश्याम अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे, उपाध्यक्ष शशिकांत देवरे, माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, उद्योजक सुनील जैन, संचालक आनंदराव रायसिंग, नीलेश पाटील, प्रा. भरत जाधव, विजय पाटील आदी उपस्थित होते. या वेळी चोसाकाच्या संचालकांनी
बारामती अँग्रोतर्फे आलेल्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.अशी माहिती कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे यांनी महाराष्ट्र 9 शी बोलताना सांगितली …