शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा,संस्थाचालक संघटना (मेस्टा) चे “आत्मक्लेश” आंदोलन.
चोपडा प्रतिनिधी :—–

मेस्टा संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले .महाराष्ट्र शासनाने आर टी ई २५% अंतर्गत शाळांना झालेल्या प्रवेशाची प्रतिपूर्ती चार वर्षापासून केलेली नाही.सदरहून संपूर्ण महाराष्ट्रात १८५० कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत.व जळगाव जिल्ह्याचे २१ कोटी रुपये थकीत आहेत.उर्वरित रक्कम केंद्रसरकारकडून महाराष्ट्र सरकारला प्राप्त असून महाराष्ट्र शासनाने केवळ ५० कोटी रुपये देवू करून तोंडाला पाने पुसली आहेत.

गेल्या एक वर्षापासून कोविड-१९ च्या कहराने शाळा बंद,विद्यार्थी येणे बंद मात्र ऑनलाईन शिक्षण चालू होते.शासनाच्या उलट -सुलट स्टेट्मेंटमुळे पालकांना शाळेची फी देण्यास रोखले परंतू शाळांना फी न मिळाल्याने इमारत भाडे,स्कूल बसचे हप्ते व इतर शिक्षकांचे पगार बाबींची वसूली मात्र केली जात होती.परिणामी सर्व शाळा,संस्था चालकांना आर्थिक कोंडीत शासनाने टाकले तसेच शाळा बंद असल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

काही शिक्षकांनी तर उपजीविकेसाठी शेतात मोलमजुरी,भाजीपाला विकणे सारखी कामे करू लागले आहेत. आर ती4 ई २५% चे शाळांचे हक्काचे पैसे मागणीसाठी ४ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून १५० निवेदने दिलेली आहेत.शिक्षकांचे उदरनिर्वाहाचे साधन गेल्यामुळे शिक्षक हवालदिल झालेले आहेत.या सर्व शिक्षकांच्या व संस्थाचालकांच्या समस्येकडे लक्ष वेधले जावे व योग्य निर्णय घेण्यात यावा यासाठी चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र राज्य मेस्टा सल्लागार जळगाव जिल्हा कांतीलाल पाटील , जिल्हा अध्यक्ष नरेश चौधरी,ऑर्किड इंटरनॅशल स्कूलचे अध्यक्ष डॉ राहुल पाटील,पंकज ग्लोबल स्कूलचे संचालक पंकज बोरोले,लिटल हार्ट स्कूलचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,विवेकानंद इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापक मनोज पाटील,पानपाटील सर , अरुण सनेर , जोशी सर तसेच संपूर्ण चोपडा तालुका इंग्रजी माध्यमाच्या शाळा,शिक्षक यांनी “आत्मक्लेश” आंदोलन केले असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना शासन स्तरावरून मानधन मिळावे अशीही मागणी करण्यात आली आहे …