महाराष्ट्र 9

पोलिसांशी हुज्जत घातल्याने पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळराव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल

[espro-slider id=13780]

पोलिसांशी हुज्जत घातल्याने पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळराव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल


चोपडा प्रतिनिधी :——
चोपडा शहरासह संपूर्ण तालुक्यात कोरोनाने थैमान घातला आहे . तसेच 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊनचे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत . त्या धर्तीवर चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर पोलिसांच्या वतीने घराबाहेर विनाकारण फिरणारे , मास्क न वापरणारे व सोशल डिस्टंसिंगचे नियमावली न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे .


छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत मास्क न वापरणारे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत असताना चोपडा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळराव सोनवणे (अकुलखेडा ) व निलेश भालेराव ( पंचशील नगर ) त्यांच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीची विना क्रमांकाची मोपेड गाडी घेऊन मास्क न लावता व हेल्मेट न घालता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले असता त्यांना त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली असता त्यांनी दारूच्या नशेत आरडाओरड करून पोलिसांशी हुज्जत घालून पोलिस करीत असलेल्या शासकीय कामात अटकाव केला तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना रोगा संदर्भात पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून दोघा आरोपींवर भाग सहा सी सी टी एन एस गु र नं १४६ / २०२१ भादवि कलम १८६ , १८८ ,२६९ ,२७० ,२७१ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२ / ११७ मोटार वाहन कायदा कलम १२९ / १७७ , १५८ / १७७ , १३० ,५१ / १७७ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) प्रमाणे पो ना संतोष पारधी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे . पुढील अधिक तपास पो ना शेषराव तोरे करीत आहे आहेत..

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]