महाराष्ट्र 9

संचार बंदी च्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात झुंडीने पोलिसांची दादागिरी अमृतराज
सचदेव व वानखेडे यांचा आरोप चोपडा

[espro-slider id=13780]

संचार बंदी च्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात झुंडीने पोलिसांची दादागिरी


अमृतराज सचदेव व अनिल वानखेडे यांचा आरोप


चोपडा(प्रतिनिधी):- चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लॉक डाऊन व संचार बंदी च्या नावाखाली पोलिसांचा झुंडीने जथा उभा असतो आणि अत्यावश्यक वस्तू अथवा औषधे घ्यायला जाणाऱ्या व भाजीपाला किंवा दवाखान्यात जाणाऱ्या अथवा लहान मुलांसाठी दूध घेण्यासाठी जाणाऱ्या सामान्य नागरिकांना मोटर सायकल वरून उतरवून मास घातलेला असतानासुद्धा बळजबरीने आर्थिक दंडाची पावती पोलीस कर्मचारी देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव व मनसेचे नेते अनिल भाऊ वानखेडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री प्रवीण मुंडे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र रायसिंग साहेब यांच्याकडे तक्रार केली आहे विशेष म्हणजे हे पोलीस कर्मचारी सामान्य माणसाचा मोटर सायकलची चाबी दादागिरीने काढून घेतात आणि त्यामुळे सामान्य माणूस रडकुंडी मॅटकुटीला जातो.


पोलिसांना खरोखर कारवाई करायची असेल तर त्यांनी अवैध धंदे करणार्‍या लोकांवर कार्यवाही करावी अथवा रिकामटेकडे शहरात प्रत्येक चौकात फिरणारे लोकांवर कारवाई केली पाहिजे तर सामान्य माणसे या पोलिसांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत गोर गरीब वर्गाला व सामान्य माणसाला पोलिसांचा दंडुका दाखवून उपयोग काय?
असा सवालही यानिमित्ताने करण्यात आला आहे या पोलीस झुंडशाहीचा अनुभव शहरातील नामांकित डॉक्टर एसटी पाटील यांचे चिरंजीव यांना व भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शीतीज चोरडिया सहित सामान्य नागरिकांना या तीन दिवसात आलेला आहे यासंदर्भात वरिष्ठांनी त्वरित दखल घ्यावी अशी मागणीही श्री सचदेव व वानखेडे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]