
चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे चक्काजाम आंदोलन
चोपडा – येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाड्याचे वतीने पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची योग्य ती चौकशी व्हावी तसेच शिवसेनेचे नेते तथा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्या द्यावा म्हणून होत असलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरा जवळील धरणगाव नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी सरकारच्या भुमिकेविरुध्द जोरदार घोषणाबाजी करुन अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.या आंदोलनात तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,भाजप नेते प्रदिप पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,जिल्हा चिटणीस रंजना श्रीकांत नेवे,तालुका सरचिटणीस हनुमंत महाजन,भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,महिला आघाडीच्या अनिता नेवे, माधुरी अहिरराव,रंजना मराठे,अल्पसंख्याकांना सेलचे संजय श्रावंगी,पंकज पाटील.देविदास बापु पाटील,लक्ष्मण पाटील,सुनिल सोनगिरे,भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक, भाईदास कोळी, गोपाल पाटील,आशिष भावसार,अमित तडवी,विजय बाविस्कर,मोहित भावे,अययुब तडवी,तेजस जैन,सुभाष पाटील,संजय वाघ,विजय पाटील,मंजुर तडवी,भुषण महाजन,राहुल मराठे,जयेश मराठे,समाधान महाजन, विजय माळी आदि कार्यकर्ते आंदोलनात सामील झाले होते.