महाराष्ट्र 9

गहू काढण्यासाठी जळगांव जिल्ह्यात हरियाणा , पंजाब राज्यातून 283 हार्वेस्टिंग मशिन दाखलशेतकरी संघटनेच्या मध्यस्थीने रुपये 1400 प्रमाणे प्रती एकर गहू काढला जाणार

[espro-slider id=13780]

गहू काढण्यासाठी जळगांव जिल्ह्यात हरियाणा , पंजाब राज्यातून 283 हार्वेस्टिंग मशिन दाखल
शेतकरी संघटनेच्या मध्यस्थीने रुपये 1400 प्रमाणे प्रती एकर गहू काढला जाणार
चोपडा प्रतिनिधी :—– सध्या सर्वत्र रब्बी पिकांची काढणी तसेच मळणीची लगबग सुरू झाली आहे .जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात व परिसरात गव्हाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांची गहू मळणीची लगबग सुरू झाली आहे .

गव्हाची कापणी करण्यासाठी हारवेस्टर मशीनचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे . जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात हरियाणा पंजाब राज्यातून हार्वेस्टर यंत्र दाखल झाली आहेत . पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता गव्हाची लवकर मळणी करण्यासाठी हारवेस्टर मशीनचा वापर करतांना दिसून येत आहे .पारंपरिक शेतीत गहू काढण्याकरिता लागणारा वेळ पाहता या हार्वेस्टर मशीनने केवळ तासाभरात काम होऊ लागल्याने यांत्रिकीकरणास शेतकरी पसंती देऊ लागला आहे . मजुरांचा वाढता तुटवडा तसेच वाढलेली मजुरी पाहता शेतकऱ्यांना हारवेस्टर मशीनने मळणी करणे अधिक सोयीचे वाटत आहे . या गोष्टीचा विचार करून जळगाव जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील , उपाध्यक्ष किरण गुजर , चोपडा तालुका अध्यक्ष सचिन सोनवणे यांनी पंजाब व हरियाणा येथील हारवेस्टर मशीनच्या मालकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची होत असलेली लूट लक्षात आणून दिली व आतापर्यंत शेतकऱ्यांकडून गहू काढण्याकरता प्रती एकर बावीसशे ते पंचवीसशे रुपये घेतले जात होते व आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी अजून अधिक भरडला जात होता , तरी शेतकऱ्यांच्या विचार करता योग्य रक्कम घेऊन शेतकऱ्यांना गहू काढण्याकरिता हारवेस्टर मशीन उपलब्ध करून देण्यास त्यांनी जिल्हा बैठकीतून हारवेस्टर मशीन चालकांना विनंती केली ,सदर विनंती हार्वेस्टर मशीन चालकांनी योग्य प्रतिसाद देऊन मान्य केली व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून गहू काढण्यासाठी फक्त चौदाशे रुपये प्रती एकर घेतले जातील असे आश्वासनही दिले . त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति एकर मागे आठशे ते हजार रुपये बचत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे आभार मानले आहेत.


जिल्ह्यामध्ये एकूण 283 मशीन पंजाब व हरीयाणा राज्यातून आले आहेत त्यापैकी चोपडा तालुक्यात 50 मशीन्स उपलब्ध आहेत .
*तरी कोणत्याही शेतकऱ्याने घाबरून न जाता , किंवा वाढीव दराने पैशाची मागणी करणाऱ्या हार्वेस्टर मशीन चालकाची तक्रार शेतकरी संघटनेकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे . तसेच चढत्या दराने गहू काढण्याचे पैसे देऊ नये असे सांगन्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]