महाराष्ट्र 9

ना.जयंत पाटील यांच्या हस्ते चोपडा न. पा. च्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

[espro-slider id=13780]

ना.जयंत पाटील यांच्या हस्ते चोपडा न. पा. च्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा;
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती


चोपडा (प्रतिनिधी)– चोपडा नगरपरिषदेने विविध विकास योजना अंतर्गत बांधलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा दि.१२ रोजी सकाळी ९.३० वाजता जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या हस्ते होत आहे.


     शासनाच्या सात विविध विकास योजना अंतर्गत कोट्यवधीचा निधी येत असतो त्या निधीचा विनियोग
कसा करायचा ? हे स्थानिक स्वराज्य संस्थेवर अवलंबून असते. यात चोपडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. ७५ लाख शासनाचे आणि १५ लाख रुपये चोपडा नगरपरिषदेचे असे एकूण ९० लाख रुपये खर्च करून ही दिमाखदार वास्तू उभी करण्यात आली आहे. या वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह रावेर मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, तालुक्याच्या आमदार सौ.लताताई सोनवणे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे माजी जिल्हा अध्यक्ष हाजी गप्फारभाई , भाजपाचे जेष्ठ नेते घनश्याम अग्रवाल, कॉग्रेस (आय) जिल्हा अध्यक्ष ऍड. संदीप भैय्या पाटिल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे


           विशेष रस्ता योजना अंतर्गत कस्तुरबा शाळा ते शिरपूर बायपास पर्यंत  “आदर्शपथ” रस्त्यासाठी जवळपास ४.३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.  जिल्हा वार्षिक योजनेत दलीत वस्तीत गटार,रस्ते व इतर सुविधासाठी जवळपास ८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच ६५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेचे ६१% काम पूर्ण झाले आहे ३१% काम पूर्ण झाले होते तोपर्यंतच शहराला पाणी मिळायला लागले होते. अश्या विविध योजना अंतर्गत कोट्यवधीचे कामे वर्षाभरात पूर्णत्वास येतील आणि चोपडा शहराचे कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे नगराध्यक्षा सौ.मनिषाताई चौधरी व मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, गटनेते जिवनभाऊ चौधरी, नगरसेवक हुसेन पठाण, अशोक बाविस्कर, रमेश शिंदें, गजेंद्र जैस्वाल, चेतन चौधरी, अकिल जहागिरीदार आदी नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]