महाराष्ट्र 9

पंकज विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

[espro-slider id=13780]

पंकज विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
चोपडा प्रतिनिधी – येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज विद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व शिवसेना प्रमुख व प्रखर हिंदुत्ववादी स्व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले . विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील आपल्या मनोगतात म्हणाले , केंद्र सरकारने थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच हिंदुहृदयसम्राट व शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे हे सर्वसामान्यांचे नेते होते .एकाने जय हिंद चा नारा दिला आहे तर दुसऱ्याने जय महाराष्ट्रचा नारा दिला आहे .


सदर कार्यक्रम प्रसंगी सी एस जाधव , ए सी पाटिल , सी आर चौधरी , योगेश चौधरी , दिलीप जयस्वाल , आर डी पाटील , गायत्री शिंदे ,जयश्री पाटील, धनश्री जावळे ,स्वाती पाटील , मनोज अहिरे ,प्रशांत पाटील ,स्वप्नील ठाकुर , प्रफुल्ल महाजन , मयुर पाटील , सचिन लोखंडे , नितीन वाल्हे ,महेश गुजर आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]