महाराष्ट्र 9

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दि. १२ मंगळवार रोजी चोपडा शहरात “सायकल व इलेक्ट्रिक बाईक रॅली” चे आयोजन

[espro-slider id=13780]

चोपडा (प्रतिनिधी सचिन जैस्वाल)

पर्यावणाचे संतुलन राखण्यावरोवरच त्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियान हाती घेतले आहे. चोपडा नगरपरिषदेत या अभियानाला सुरुवात झाली असून, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे शहरात हे अभियान राबविले जाणार आहे.

या अभियाना अंतर्गत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दि. १२ जानेवारी २०२१ मंगळवार रोजी चोपडा शहरात “सायकल व इलेक्ट्रिक बाईक रॅली” चे आयोजन करण्यात आले आहे. रॅली ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून – गोलमंदिर – आशा टॉकीज – भोकरवाडा पोलिस चौकी – पाटील दरवाजा ते नगरपरिषद कार्यालय येथे सांगता होणार असून नगरपरिषद प्रांगणात माझी वसुंधरा शपथ घेण्यात येणार आहे. तसेच ई- बाईक्स वापरणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रॅलीत सहभागी होण्यासाठी स्वतःची सायकल किंवा इलेक्ट्रिक बाईक घेऊन छ. शिवाजी महाराज चौकात सकाळी ८.३० वाजता हजर राहावे असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.मनीषा जीवन चौधरी व मुख्याधिकारी श्री. अविनाश गांगोडे यांनी केले आहे.
रॅली साठी येतांना प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]