महाराष्ट्र 9

चोपडा येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथील १७ वर्षीय आदिवासी मुलगी गरोदर #अल्पवयीन मुलीवरअत्याचार प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल #आरोपीस अटक..

[espro-slider id=13780]

चोपडा येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथील १७ वर्षीय आदिवासी मुलगी गरोदर #अल्पवयीन मुलीवरअत्याचार प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल #आरोपीस अटक…

चोपड्यात शिरपूर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर २०२३ पासून अत्याचार  चोपडा येथे दोन वर्षांपासून अत्याचार होत होता पीडित मुलीचे पोटात दुखापत होत असल्यामुळे दवाखान्यात उपचारासाठी आल्यावर ती गरोदर असल्याचे कळाले. त्यानंतर सदर पीडितेने तीच्यावर अत्याचार झाल्याची फिर्याद चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिली. आरोपीस रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संशयित आरोपी रुग्णालयात नेताना चोपडा पोलिस


     पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी चोपडा येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्या अल्पव्यीन मुलीवर अविनाश वेस्ता पावरा याने जानेवारी २०२३ मध्ये चोपडा शहरातील शिरपुर रोडवरील एका हॉस्पिटलच्या मागे असलेल्या पीडितेच्या मैत्रिणीच्या रुमवर चार वेळेस तसेच २६जून २०२५ रोजी सकाळी ११वा च्या सुमारास शिरपुर रोडालगत असलेल्या हरेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाडा झुडपां मध्ये पीडितेवर अत्याचार केला या घटनेविषयी गृहपाल लता सरडे यांना विचारणा केली असता गृहपाल यांनी टाळाटाळ केली व या घटनेची जबाबदारी नेमकी कोणावर आहे असे विचारणा केली असता या विषयी बोलायचे टाळले.

गृहपाल लता सरडे यांनी सांगितले की यावर आमचे वरिष्ठ बोलतील पण वरिष्ठ कधी येतील या बाबत माहिती नसल्याचे सांगितले आणि उपजिल्हा रुग्णालय येथून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता तेथून घरी निघून गेले. अद्याप ही प्रकल्प कार्यालयातून कोणतेही अधिकारी न पोहचल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल ची प्रक्रिया सुरू होती.

अविनाश वेस्ता पावरा रा.अंमलवाडी पोस्ट उमर्टी ता चोपडा जि जळगाव यांचे विरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात सिसिएनटीएस २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४,६५(१)  सह बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा कलम सन २०१२ चे कलम ४,५(१)(२),६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]