महाराष्ट्र 9

शेतकऱ्यांनी कर्ज माफीची आस नाहि तर फेडीची कास धरावी : उद्योगपती घनश्याम भाई अग्रवाल # गोरगावले विकास सोसायटी जिल्ह्यात नंबर वन ..पावणे तीन कोटींची कर्ज वसुली

[espro-slider id=13780]

शेतकऱ्यांनी कर्ज माफीची आस नाहि तर फेडीची कास धरावी : उद्योगपती घनश्याम भाई अग्रवाल
# गोरगावले विकास सोसायटी जिल्ह्यात नंबर वन ..पावणे तीन कोटींची कर्ज वसुली

चोपडा दि.१९(प्रतिनिधी ) चोपडा तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून कर्ज वसुलीत गोरगावले विकास सोसायटी नंबर एक वर आहे ही बाब चोपड्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी नुसत्या कर्जमाफीवर लक्ष न देता आपापल्या परीने घेतलेले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत राहा तरच बँका जिवंत राहतील व आपलेही आर्थिक नियोजन कोलमडणार नाही.

आजच्या घडीला सरकारवर फार मोठा कर्जाचा डोंगर असून शेतकऱ्यांनी कर्ज माफीची आस न धरता कर्जाचे हप्ते भरण्याची कास धरावी असे आवाहन उद्योगपती तथा जेडीसीसी बँक संचालक घनशामभाई अग्रवाल यांनी आज येथे व्यक्त केले. ते चोपडा जिल्हा बँक शाखेत गोरगावले विकास सोसायटी चेअरमन, व्हाय चेअरमन, सचिव यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते.


चोपडा तालुक्यात कर्ज वसुली मध्ये जिल्हा बँक गतकाळात अग्रेसर होती सध्या ती पातळी खालावली असून गेल्या वर्षी अवघ्या 18 बॅंक शाखांनी जोरदार वसुली केली होती ती टक्के वारी सर्व कर्जदार शेतकरी बांधवांनी एकत्रित येत विचार विनिमय करून वाढवायची आहे.गोरगावले विकास सोसायटीने यंदा पावणेतीन कोटी रुपयांची 100% कर्ज वसुली करत जिल्ह्यात नंबर एक आणला आहे त्या सर्व चेअरमन संचालक मंडळाचे मी मनापासून आभार मानतो . अशीच चमकदार कामगिरी सर्व सोसायट्यांनी करावी असेही त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार समारोह पार पडला.


यावेळी अजय देशमुख ,किशोर कदम, सतीश पाटील, कुंदन पाटील, शीतल काशिनाथ हिरे, उज्वल विनोद पवार, माधुरी महेंद्र पाटील, मुस्ताक शाह, सचिन पाटील, घनश्याम पाटील, संजय पाटील, अधिकार पाटील, अशोक राजपूत क्षेत्रीय अधिकारी, डी. ए .पाटील, पत्रकार महेश शिरसाठ ,के.पी.पाटील,किशोर भालोदकर, नारायण पाटील, चंपालाल फुलचंद जाधव सचिव गोरगावले ,प्रवीण पाटील, गोवर्धन गंगाराम पाटील, लोटन काशीनाथ पाटील ,पंकज माळी, विजय बोरसे, निंबा बोरसे यांच्यासह चोपडा तालुक्यातील सर्व कर्मचारी हजर होते.कार्यक्रम यस्वीतेसाठी सतिष पाटील, सचिन पाटील, संजय पाटील, श्याम पाटील यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]