महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील वडती-बोरखेडाचे सरपंचसह अधिकाऱ्याची चौकशी

[espro-slider id=13780]

चोपडा तालुक्यातील वडती-बोरखेडाचे सरपंचसह अधिकाऱ्याची चौकशी

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क

चोपडा तालुक्यातील वडती/बोरखेडा गृप ग्रामपंचायत चे सरपंच देवीदास हरीशचंद्र व ग्रामपंचायतीचे अधिकारी दीपक भामरे यांची चौकशी करण्यात आली. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या ३ डिसेंबरच्या पत्रानुसार, विस्तार अधिकार रामचंद्र सैंदाणे व पंचायत समितीतील कनिष्ठ साहाय्यक (लेखा) ए. बी. सोनवणे यांनी ही चौकशी केली.

विद्यमान सरपंच देवीदास धनगर यांनी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८, नियमबाह्य फेरफार करून चुकीच्या पद्धतीने मूळ मिळकत हक्क बदलणे, सार्वजनिक वाचनालयाच्या जागेस विरोध करणे, जानेवारी २०२४ मध्ये सरपंच पदावर येताच कुठलीही निविदा प्रक्रिया न करता,
ग्रामसभा, मासिक सभेत विषय न घेता, परस्पर काँक्रिट गटारीचे काम, बांधकाम करून धनादेशही काढले.गरजू लोकांना डावलून ज्यांच्याकडे राहण्यास घर आहे, अशा कुटुंबातील तीन जणांना, त्यांच्या नातेवाईकांना मोदी आवास योजनेचा लाभ निश्चित केला आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच धनगर यांना अपात्र करावे, अशी तक्रार ग्रामस्थ नंदलाल पाटील, डॉ. भरत धनगर, गणेश पाठक, संजय भिल यांच्यासह इतर ग्रामस्थांनी केली होती. त्याअनुषंगाने संबंधितांची चौकशी झाली. अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]