महाराष्ट्र 9

चोपडा रोटरी डायलिसिस सेंटरची वर्षपूर्ती

[espro-slider id=13780]

चोपडा रोटरी डायलिसिस सेंटरची वर्षपूर्ती

चोपडा रोटरी डायलिसिस सेंटरच्या वर्षपूर्ती निम्मिताने हरताळकर हॉस्पिटल कळून रुग्णांची मोफत डायलिसिस चाचणी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि हरताळकर हॉस्पिटल संचलीत ना नफा ना तोटा तत्त्वावर 30 जून 2023 रोजी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरवर नाम मात्र दरात डायलिसिस होत असून, गेल्या एका वर्षांत येथे तब्बल 342 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


बदललेली जीवनशैली, खाण्याच्या बदललेल्या सवयी, मधुमेहाचे वाढते प्रमाण आदी कारणांमुळे किडनी विकार वाढले आहेत. त्यामुळेच किडनी निकामी होण्याचेही प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये साधारणपणे दरवर्षी एक लाख रुग्णांना किडनीचे आजार उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी चोपडा मधील रुग्णांना नियमितपणे डायलिसिसची सेवा मिळावी, यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि हरताळकर हॉस्पिटल यांनी डायलिसिससेंटर सुरु केले आहे.


किडनी निकामी झालेल्या रुग्णांना आठवड्यातून किमान तीनवेळा डायलिसिसची आवश्यकता भासते. यासाठी खासगी रुग्णालयात सुमारे दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु चोपडा रोटरी डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांना फक्त 900 रुपये दराने डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती चोपडा डायलिसिस सेंटरचे प्रमुख डॉ अमित हरताळकर आणि ॲड रुपेश पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]