महाराष्ट्र 9

रावेर लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रीपद .# चोपडा तालुका भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला जल्लोष…

[espro-slider id=13780]

रावेर लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रीपद # चोपडा तालुका भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला जल्लोष…

रावेर लोकसभा मतदार संघात पक्षाशी एकनिष्ठ आणि सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकाविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये रावेरच्या रक्षा खडसे यांना मंत्रिपदी संधी मिळाली आहे.


कोथळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. सासरे एकनाथ खडसे यांनी मध्यंतरी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तरीही रक्षा खडसे या भाजपबरोबर एकनिष्ठ राहिल्या. त्याचे फळ त्यांना आता मिळाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. संगणकशास्त्रातील पदवीधर आणि मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत.

रक्षा खडसे या २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत.रक्षा खडसे यांचा जन्म १३ मे १९८७ रोजीचा झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला. २०११ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी निखिल खडसे यांचा पराभव केला. तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरू झाला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच २०१३ मध्ये निखिल खडसे यांनी आत्महत्या केली. रक्षा खडसे यांच्यासाठी ही मानसिक आघात करणारी घटना होती. परंतु, यातून त्या सावरल्या. पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक कार्यात झोकून दिले.कोथळी गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, २०१४ मध्ये रावेर मतदारसंघातून खासदार, असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. १६ व्या लोकसभेत वयाच्या २७ व्या वर्षी निवडून गेलेल्या रक्षा खडसे या सर्वांत तरुण खासदारांपैकी एक होत्या. २०१९ व २०२४ लोकसभा निवडणुकीतही पक्षाने पुन्हा रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवला आणि मतदारांनी रक्षा यांच्यावर विश्वास ठेवला.

चोपडा तालुका भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या व बाबासाहेबांचा पुतळ्याला पुष्पहार घालत  ढोल ताशे वाजवत ,फटाके फोडत ,मिठाई वाटत जल्लोष साजरा केला यावेळी भाजप सह मित्र पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आत्माराम म्हाळके उपजिल्हाध्यक्ष राकेश पाटील,तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील , विधानसभा क्षेत्र प्रमुख गोविंद सैंदाणे, माजी तालुका अध्यक्ष पंकज पाटील, माजी शहर अध्यक्ष गजेंद्र जैस्वाल,संजय श्रावगी,सुनील सोनगिरे, यांचा सह मनसेचे अनीलभाऊ वानखेडे,शिवसेना(शिंदे गट)राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर ठेका धरात आनंद उत्सव साजरा केला.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]