महाराष्ट्र 9

बनावट चलनी नोटांचा भरणा केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

[espro-slider id=13780]

बनावट चलनी नोटांचा भरणा केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

चोपडा दि.१७ रोजी गोकुळ सुखदेव सोनवणे राहणार चोपडा येथील विद्याविहार कॉलनी यांनी चोपडा येथील ॲक्सिस बँकेच्या बाहेर लावलेल्या रिसायकलर (डिपॉझिट मशीन) मशीन मध्ये २० हजार रुपयाचा भरणा केला त्यानंतर त्यांचा खात्यात १७ हजार ५०० रुपयाचा भरणा  झाला असल्याचे मेसेज आले त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता रिसायकलर मशीन उघडल्यावर काय ते सांगता येईल येवढे एकून ते निघून गेले .

दुसऱ्या दिवशी सी एम एस कंपनीचे कर्मचारी ललित पाटील ,मच्छिंद्र कोळी दि.१८ रोजी बँकेचे कर्मचारी यांनी मशीन उघडले असता त्यात पाच शे रुपयाचे पाच बनावटी नोटा मशीन चा बाकी मधे आढळून आले बकेटमध्ये ५०० रु च्या ५ नोटा (एकुन रक्कम २५०० रु) बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आहे तेव्हा काउंटर स्लिप मध्ये नमुद अकाउंट क्रमांक वरून गोकुळ सुखदेव सोनवणे हा आरोपी असल्याची खात्री झाल्याने फिर्यादी हर्षल जयविलास जैन यांचा फिर्यादी वरून सदर आरोपी याने त्याचे कब्जातील भारतीय चलनातील ५००/- रु दराचे ४० नोटा असे एकुण २००००/- पैकी ५००/- रु.दराच्या ५ (पाच) असे एकुण २५००/- रु किमतीचे बनावट नोटा आरोपी मजकुर यास माहित असुनही त्याने जाणीवपुर्वक त्या बनावट/नकली चलनी नोटा खऱ्या असल्याचे भासवुन बैंक खात्यात जमा करुन चलनात आणल्या म्हणुन भादवि कलम ४८९ (व), ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  आला आहे .पुढील तपास सपोनि एकनाथ भिसे करत आहे .

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]