गाडीचे सायलन्सर चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक
दिनांक २७/०३/२०२३ रोजी मा.श्री किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय माहिती मिळाली की, अमळनेर शहरातील मनिष उर्फ सनी महाजन हा त्याचे साथिदार यांचे सोबत मारुती सुझकी कंपनीची इको गाडीचे सायलन्सर चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करणे बाबत किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोह संदिप पाटील, कमलाकर बागुल, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील सर्व नेमणुक स्थनिक गुन्हे शाखा पथकास रवाना करुन पुढील कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

त्यावरून वर नमुद पथकाने अमळनेर शहरात जावून मिळलेल्या बातमी प्रमाणे मनिष उर्फ सनी महाजन याची माहिती काढून त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) मनिष उर्फ सनी रविंद्र महाजन, रा. शिरुड नाका, श्रीराम कॉलनी अमळनेर असे सांगीतले. त्यावेळी त्यास मिळालेल्या बातमीची विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांने त्याचे सोबत साथीदार २) शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील, रा.राजाराम नगर अमळनेर, ३) निखील संतोष चौधरी, रा.राजाराम नगर अमळनेर अश्यांचे नाव सांगीतल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी त्यांचा अजुन एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी, रा. रामेश्वर कॉलनी अमळनेर असा असून तो सध्या नाशिक जेल

मध्ये असल्याचे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी अमळनेर पोलीस.स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच आरोपी १) मनिष उर्फ सनी रविंद्र महाजन, रा. शिरुड नाका, श्रीराम कॉलनी अमळनेर याचे कडून १ चोरीची मोटार सायकल मिळाली असून सदर मोटार सायकल बाबत तपास केला असता

त्याबाबत नाशिक जिल्ह्यातील आडगाव पो.स्टे. ला गुन्हा दाखल असले बाबत माहिती मिळाली आहे. नमुद तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांना पुढील तपासकामी अमळनेर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा.श्री सुनिल नंदवालकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

