
दहा वर्षाच्या कार्तिकची वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत
चोपडा :–
शहरातील शिव कॉलनी भागातील रहिवासी असलेले सेनेचे नगरसेवक महेश पवार व जगदीश पवार यांच्या दहा वर्षांच्या चिमुकला कार्तिक पवार याने आपल्या वाढदिवसा निमित्ताने वर्षभर जमा झालेले खाऊचे सात हजार चारशे रुपये कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. सदर निधी त्याने तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे जमा केला. या चिमुकल्याच्या कृतीने सर्वच भारावले असून त्याच्या पुढील भविष्यासाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्तिक पवार याचा ८ मे रोजी दहावा वाढदिवस होता त्या निमित्ताने त्याने टी व्ही वरील बातम्यांमधून प्रेरणा घेत स्वतःच्या गल्ल्यात जमा झालेले पैसे कोरोना बाधितना देण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार त्याचे वडील जगदीश पवार यांनी त्याच्याकडे जमा झालेले सात हजार चारशे रुपयांची रक्कम त्याला सोबत घेऊन चोपडा तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे दिली. यापूर्वी त्यांनी वेले येथील मनोरुग्णांना फळे व बिस्कीट चे वाटप करत एका वेगळ्या पद्धतीने कार्तिकने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी चोपडा पालिकेचे गटनेते जीवन चौधरी, सेनेचे शहरप्रमुख आबा देशमुख ,साहिल पवार,स्वप्नील बाविस्कर,महेंद्र साळुंखे,प्रसाद पाटील उपस्थित होते.

मी इयत्ता चौथीच्या वर्गात आहे.मी माझ्या गल्ल्यात अनेक दिवसांपासून लॅपटॉप घेण्यासाठी पैसे जमा केलेले होते. परंतु मी गल्ल्यात जमा झालेले सर्व पैसे कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी साहेबांना दिले.
कार्तिक पवार