आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकरी समस्या निवारण मेळावा संपन्न۔۔
चोपडा तालुक्यातील आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानी संदर्भात ,जमिनीची पोट खराब व पी एम किसान योजना, जमीन मोजणी विद्युत रोहित्र,पीक विमा संदर्भात अडचणी येत होत्या अशा शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शेतकरी बांधवांना अडचणीची दखल घेत आ.सौ. लताताई सोनवणे व मा.आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज जागच्या जागी दखल घेऊन संबंधित अधिकारी यांना शेतकऱ्यांना सर्व बाबतीत येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी सुचना केल्या .

यावेळी कॢ.उ. बा. सभापती नरेंद्र पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ, सहाय्यक निबंधक संजय गायकवाड,संचालक शिवराज पाटील, गोपाल पाटील, विजय पाटील,किरण देवराज, राजेंद्र पाटील, ए.के. गंभीर सर,प्रकाश राजपूत,किशोर पाटील,कैलास बाविस्कर, दशरथ बाविस्कर,अशोक जाधव, किशोर पाटील,संतोष पाटील, अश्फाक जहागीरदार,मंगल इंगळे, अनु ठाकुर, संदिप पाटील,संदीप कोळी व महसुल, ,कॢषी,एम.एस.ई.बी. व भुमी अभिलेख विभागाचे सर्व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
