महाराष्ट्र 9

गुर्जर समाजाचे पाऊल पडतेय पुढे!कोसगावच्या पूनमची उंच भरारी युरोपियन पार्लमेंट मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड….

[espro-slider id=13780]

गुर्जर समाजाचे पाऊल पडतेय पुढे!कोसगावच्या पूनमची उंच भरारी युरोपियन पार्लमेंट मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड….

यावल तालुक्यातील कोसगाव येथील रहिवाशी पुनम विजय चव्हाण हिची युरोपियन पार्लमेंट मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाल्याने जळगाव जिल्ह्यातील दोडे गुर्जर समाजात तिचे व तिच्या वडिलांचे कौतुक होत आहे.


युरोपियन पार्लमेंट डेव्हलपर या पदासाठी भारतातून 17000 विद्यार्थी यांनी ऑनलाईन परीक्षा दिली त्यातून प्रथम क्रमांकाने कोसगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथील पुनम विजय चव्हाण हिची निवड करण्यात आली
पुनम हिचे शिक्षण भुसावळ सेंट अलायसिस शाळेत दहावीपर्यंत शिक्षण झाले व बारावीपर्यंत औरंगाबाद येथे तर इंजिनिअरिंगला नाशिक येथे तिचे शिक्षण झाले अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये वडिलांनी तिचे शिक्षण केले
पुनम ही मनवेल तालुका यावल येथील आदिवासी आश्रम शाळेत नोकरीवर असलेले विजय चव्हाण सर राहणार कोसगावकर यांची मुलगी असून तिच्या दैदिप्यमान अशा यशामुळे चव्हाण परिवार कोसगाव सह संपूर्ण जळगाव धुळे जिल्ह्यातील डोळे गुजर समाजामध्ये तिचे कौतुक होत आहे.


तिच्या यशामुळे कोसगावकरांचे मन सुभे उंचावले असून तिच्या यशामुळे कोसगावकरांचा मानाचा तुरा रोवला गेला आहे एका खेड्यातील रहिवासी मुलगी एवढे उंच शिखर गाठू शकते त्यासाठी वडिलांची मेहनत तिच्या यशा मागील खरे कारण असून ती आपल्या वडिलांनाच या यशाची भागीदार बनवते तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील नामदार गिरीश भाऊ महाजन खासदार रक्षाताई खडसे डोळे गुजर समाजाची जिल्हा अध्यक्ष खर्डी तालुका चोपडा येथील रहिवासी चंद्रशेखर दादा पाटील आणि यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी मनवेल आश्रम शाळेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील उपाध्यक्ष यादवराव पाटील या शाळेतील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पत्रकार अरुण पाटील यांच्यासह आदींनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]