
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश
जळगाव :- सध्या सुरू असणाऱ्या कोरोनाच्या
आपत्तीच्या पार्श्वभूमिवर धरणगाव, रावेर आणि चोपडा येथील ग्रामीण रूग्णालयात सामग्री खरेदीसाठी 1 कोटी 11 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोविड-19 विरूध्दच्या लढ्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशावरून या निधीला प्रशासकीय मिळाली आहे.
कोविड – 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार धरणगाव,चोपडा व रावेर येथिल ग्रामीण रुग्णालयात साहित्य सामुग्री खरेदी करण्यासाठी 1 कोटी 11 लक्ष निधीस जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्यामुळे तिन्ही ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी फायदा होणार आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील धरणगाव, चोपडा व रावेर येथे ग्रामीण रुग्णालयात आवश्यक साहित्य सामग्रीसाठी उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांना दिल्या होत्या. त्यानुसार रावेर व चोपडा येथे डिजिटल एक्स रे मशीन,हिमोग्लोबीन मीटर,ओटी टेबल,ओटी लाईट व ऑक्सिजन लेवल पीर खरेदी सा लक्ष तर धरणगाव ग्रामीण रुग्णालया करिता
डिजिटल एक्स रे मशीन,हिमोग्लोबी मीटर,ओटी टेबल, ओटी लाईट व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, एन ९५ मास्क,सॅनिटीझर, पी.पी.ई. किट, इन्फ्रारेड थर्मोमिटर,ट्रिपल लेयर मास्क,हॅन्डग्लोज,जम्बो ऑक्सिजन सिलेंडर , डिजिटल मॅमोग्राफी मशीन या साहित्य समुग्रीच्या खरेदीसाठी ७० लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून तात्काळ टेंडर देखील सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य विभागाने काढले आहे.या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोविड-१९ विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत असून धरणगाव, रावेर व चोपडा येथील ग्रामीण रूग्णालयात या संसर्गाचा प्रतिकार अधिक चांगल्या पध्दतीत करता येईल. या रूग्णालयांमध्ये तातडीने सदर सामग्री खरेदी करून वापरात आणण्याचे निर्देश देखील ना. पाटील यांनी दिलेले आहेत.