प्रताप विद्या मंदिराची उज्वल यशाची परंपरा कायम
(कॉपीमुक्त वातावरणात तालुक्यातून चैतन्य सुनिल पाटील प्रथम )
चोपडा प्रतिनिधी चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराचा विद्यार्थी चैतन्य सुनील पाटील याने 99 % गुण मिळवून तालुक्यात प्रथम येत शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल 99.25 % लागला असून उर्दू विभागाचा 100% लागलेला आहे. तसेच नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचा निकाल 94% लागला आहे.एस एस सी मार्च 2023 परीक्षेला प्रताप विद्या मंदिरात 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे 36 विद्यार्थी तर विशेष प्राविण्यसह 170 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 130 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.


विद्यालयातून प्रथम पाटील चैतन्य सुनील 99%, द्वितीय पाटील प्रांजल समाधान 97.20%, तृतीय महाजन रुपक शाम 97%, चतुर्थ पाटील पवन रामकृष्ण 96 . 40 % , पाचवी वाणी अनघा सतिष 96.20% तसेच यांना प्राप्त झाला आहे.

उर्दू विभागातून मुसन्नेफा खातून अकील मन्यार हिने 82.20% गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल ,चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, संस्था संचालक उर्मिलाबेन गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी, रमेशकाका जैन, प्रशालेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील तसेच संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, सर्व शाखांचे पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी लेखनिक कर्मचारी बंधूनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
