महाराष्ट्र 9

वीस दिवसाच्या बाळाला बाहेर सोडून प्रणालीने दिली सीईटी …

[espro-slider id=13780]

वीस दिवसाच्या बाळाला बाहेर सोडून प्रणालीने दिली सीईटी …

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क अडावद प्रतिनिधी

आज राज्यभर बी एड सीईटीचा पेपर होता.तो देण्यासाठी चोपडा येथील प्रणाली निकम हिने तिच्या वीस दिवसाच्या बाळाला आई जवळ सोडून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पेपर दिला.

अडावद येथील प्रणाली निकम पुणे येथे राहते.बी एड च्या सी इ टी साठी ती चोपडा येथे आली होती.आज विद्यापीठात बाळाला त्याच्या आजीजवळ सोडून बाहेर झाडाखाली सोडून तिने सी इ टी चा पेपर दिला.मात्र पेपर देऊन परत येईपर्यंत तिच्या जीवाची घालमेल झाली होती..
प्रणाली मोरे हिचे गेल्या वर्षी १५मे ला लग्न झाले होते प्रणाली महेश निकम हे पूणे येथे पती महेश निकम बॅकेत नौकरीला असुन प्रणालीला विस दिवसाची मुलगी आहे ती वडिलांन कडे चोपडा येथे आली होती आज तिचा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापिठात बी एड सीईटीचा पेपर होता सकाळी प्रणाली निकम तिचा २० दिवसाचा बाळाला घेऊन आजी आजोबा सोबत उत्तर महाराष्ट विदया पिठात पोहचले सकाळी साडे आठ पासून प्रणाली निकम पेपर देण्यासाठी वर्गात गेली इकडे लहान बाळ आजी सोबत झाडाखाली मांडीवर तर कधी झाडांच्या फांदीवर झोक्यावर तर कधी मांडीवर दुध पाजुन तब्बल दोन तासानंतर सीईटीचा पेपर देऊन प्रणाली निकम बाहेर आली तिकडे पेपर देताना तिचे संपूर्ण लक्ष इकडे बाळा कडे होत तिच्या जिवाची घालमेल झाली होती
अडावद येथील उपशिक्षक व सकाळचे बातमीदार रोहिदास मोरे यांची प्रणाली मुलगी आहे
तिचे अडावद व चोपडा परिसरात कौतुक करण्यात येत आहे

फोटो कॅप्शन जळगांव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे लहान बाळाला झाडाखाली बसून आजी बाळाला दुध पाजताना

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]