*मंजूर रस्ता त्वरीत व्हावा.. सहा गावांचे नागरीक एकवटले… रस्ता न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा तालुक्यातील गरताड , कुरवेल ,
सनपुले फाटा (चिंध्या देव) कुरवेल ,तावसे बु. , खाचणे , निमगव्हाण पर्यंत अतिशय खराब व खड्डेमय रस्ता त्वरीत मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात यावा यासाठी तब्बल सहा गावातील तरुण व नागरीक एकवटले व त्यांनी सदर रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे यासाठी सार्वजनिक विभाग उपअभियंता राजपूत यांना निवेदन दिले.

चोपड़ा – गरताड – कुरवेल – सनपुले फाटा ( चिंध्या देव ) – कुरवेल – तावसे बु.- खाचणे – निमगव्हाण पर्यंत रस्ता मंजूर असल्याचे संबंधित विभागाकडून जानेवारी २०२१ पासून तोंडी सांगितले जात आहे. मध्यंतरी टेंडर प्रक्रिया होऊन झाल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले मात्र कुठलीही कार्यवाही आता पर्यंत पहावयास मिळत नाहीये, रस्त्याने दर दिवसा छोटे मोठे अपघात घडतच आहेत, या रस्त्यावर वरील सर्व गावांचा मुख्यबाजारपेठ चोपड्याशी आहे. शेती मालवाहतूक, आरोग्यच्या प्रश्नांसाठी ,शिक्षणासाठी व नोकरी व्यवसायासाठी अशा अनेक कारणासाठी चोपड़ा शहराशी या गावांची नाळ आहे. या रस्त्यावर दिवसागणिक ४०० ते ४५० शेतीमाल वाहतूक (केळी, ऊस, पपई इ.) भरून व इतर वाहने ये जा करत असतात. अनेकदा या बाबत दैनिक वर्तमान पेपरमध्ये वास्तवता दाखवून सुद्धा सदर विभाग कडून काहीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सर्व गावातील गावकरी पूर्वपार पासून या रस्त्या च्या समस्येमुळे असहय त्रस्त झालेले आहेत. आरोग्यासाठी तालुक्यावर येत असतांना खराब रस्त्यामुळे रस्त्यातच रूग्ण दगावली आहेत, तरी संबंधित विभाग/ प्रशासन/ यांनी या बाबत उदारता दाखवून तत्काळ हा रस्ता मजबुतीसह डांबरीकरण होणेसाठी तत्परता दाखवावी असे निवेदनात नमूद केले आहे.
सदर निवेदनाचा १ महिन्याचा आत विचार व्हावा व तसे आम्हाला लेखी स्वरुपात ठोस आश्वासन मिळावे अन्यथा सर्व नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करू, व होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभाग जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.सदर निवेदनावर देण्यासाठी गावातील सर्व त्रस्त नागरिक चोपडा सार्वजनिक बांधकाम येथे उपस्थित होते..
