महाराष्ट्र 9

रोटरी क्लब ऑफ चोपडा द्वारा आयोजित , उत्सव २३ च्या जागेचे भूमीपूजन विधीवत संपन्न…

[espro-slider id=13780]

रोटरी क्लब ऑफ चोपडा द्वारा आयोजित , उत्सव २३ च्या जागेचे भूमीपूजन विधीवत संपन्न..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी)-


चोपडा येथील येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात रोटरी उत्सव २०२३ करिता जागेचे भूमीपूजन विधीवत संपन्न झाले. यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेला प्रेसिडेंट रोटे. ॲड रूपेश पाटील यांनी संबोधित केले.
जीवनाचा आनंद रंगे – रोटरी उत्सवाच्या संगे’ हया थीमनुसार चोपडा रोटरी क्लब ने उत्सव २३ चे आयोजन केले आहे. कृ.उ.बा.स- आवारात रोटे. ॲड रूपेश पाटील रोटे. चेतन टाटीया, रोटे तेजस जैन , रोटे.आशिष गुजराथी, रोटे.चंद्रशेखर साखरे आदी मंचावर उपस्थित होते.रोटे.नितीन अहिरराव व पवन गुजराथी यांनी विधीवत भूमीपूजन केले.


पवित्र मंत्रोपचारात पुरोहितांनी आरती करून प्रसाद वाटप केले. रोटरी संस्थापक पॉल हॅरिस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी आयोजित पत्रपरिषदेत उपस्थित पत्रकारांचे स्वागत व सत्कार भेटवस्तु देऊन करण्यात आला. रोटरी प्रेसिडेंट ॲड रुपेश पाटील यांनी रोटरी उत्सवाचे महत्व व यांत सहभागी व्यावसायीकांना नव्या उद्योग व्यवसायाची चालना व रोजगार निर्मीतीकरिता रोटरी उपक्रमाविषयी सांगितले की; बिझिनेस स्टॉल ४९, प्रिमियम कॉर्नर स्टॉल ३, एकझीकेटीव्ह स्टॉल २, प्रिमियम बिझिनेस स्टॉल १४, प्रिमियम ऑटोस्टॉल ६, खाद्यपदार्थ स्टॉल ६० अशा एकूण १३८ दुकानांद्वारे या उत्सवात ग्राहकांसाठी विक्री तसेच बालगोपालांसाठी हौसमौज व विविध करमणुकीची साधने , खेळण्यांची दुकाने या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.


यावेळी रोटे.प्रविण मिस्त्री ,डॉ. शेखर वारके, रोटे.आशिष गुजराथी, रोटे. नितीन अहिरराव ,रोटे. डॉ. प्रफुल्ल पाटील, रोटे.संजीव गुजराथी,रोटे.व्ही एस पाटील, रोटे.नरेंद्र तोतला , रोटे.विपूल छाजेड, रोटे.अरूण सपकाळे, रोटे.प्रदिप पाटील, रोटे. रमेश वाघजाळे , रोटे.विलास पाटील, रोटे रुपेश नेवे आदि मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]