

या बाबत सविस्तर वृत्त असे की धुळे येथील संजय नारायण चौधरी (टाटा मोटर्स च्या बाजूला जे सी बी शो रूम जवळ धुळे ) हे मुलगा दिनेश संजय चौधरी याचा साखरपुडा पाचोरा येथील प्रकाश चौधरी रा प्रकाश टॉकीज जवळ या कुटुंबा सोबत दिनांक ९ रोजी होता या साठी संजय नारायण चौधरी हे आपली कार एम एच १८ बी सी ०५७५ सह अन्य दोन गाडी सह गेले होते दुपारी साखरपुडा आनंदात आटोपून सायंकाळी ५ वाजता हे सर्व जण पाचोरा येथून धुळे कडे जाण्यास निघाले धुळे येथील तिन्ही गाडी सोबत निघाले होते या वेळी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आशिया महामार्गा ४६ वर पारोळा धुळे रोड वर पारोळा पासून ३ किमी अंतरावर विचखेडे गावानजीक धुळे कडून पारोळा कडे येणारी बस शिर्डी-भुसावळ(एम एच २० बी एल ३९४३ भुसावळ डेपो ची बस) या वरील चालक अरुण काशीनाथ कोळी (५७) रा साकेगाव हा भरधाव वेगाने समोरून येत होती तर पारोळा कडून धुळे कडे जाणारी सियाज कार एम एच १८ बी सी ०५७५ यांच्यात समोरासमोर जोरात धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की बस ने कार का काही अंतर फरफटत नेले व कारचा चेंदामेंदा झाला व कार ची दिशाच बदलली या कार मधील नवरदेव चे वडील संजय नारायण चौधरी(४५) बहीण मिनल संजय चौधरी (२३) ,काकू सरला रविंद्र चौधरी (४५) हे जागीच ठार झालेत तर आई नीता संजय चौधरी (५०) ,काका रविंद्र नारायण चौधरी (६८) , पुतण्या विवान स्वप्नील चौधरी (५) सर्व राहणार धुळे हे गंबीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.अपघात भीषण या दोन्ही वाहनाचा अपघात एवढा भीषण होता की सियाज कार चा चेंदामेंदा झाला होता कार चालक संजय नारायण चौधरी हे कार मध्ये फसले होते क्रेन च्या साह्याने कार चा पत्रा बाजूला करून संजय चौधरी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला
बस पलटी होताहोता वाचली
घटनास्थळी पाहिले असता बस ही पलटी होताहोता वाचली महामार्गाच्या कडे तिरकस पणे बस उभी होती या बस मध्ये एकूण ५० ते ५५ प्रवाशी होते अपघात झाल्या बरोबर अनेक प्रवाशी खाजगी वाहनाने पारोळा पोहचले तर जळगांव भुसावळ येथील प्रवाशी याना वाहक जी एच शेख यांनी दुसऱ्या बस मध्ये रवाना केले तर बस चालक अरुण काशीनाथ कोळी हे अपघात स्थळा वरून एका मोटार सायकलने थेट पोलीस ठाणे गाठले
घटनास्थळी अनेकांचे हात मदतीला
अपघात एवढा भीषण होता की गावातील अनेकांनी मदतीचा हात पुढे करीत मदत कार्य केले रुग्ण वाहिका चालक ईश्वर ठाकूर ,यश ठाकूर ,शरद पाटील यांनी जखमी व मयताना पारोळा कुटीर रुग्णल्यात उपचारासाठी आणले वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश साळुंखे ,यांनी जखमी वर प्राथमिक उपचार करून धुळे येथे हलविण्यात आले

