शासकीय रेखाकला परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे घवघवीत यश 27 विद्यार्थ्याना ‘ए’ ग्रेड प्राप्त

चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयाचा प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील शासकीय रेखाकला परीक्षा अर्थात एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत 91.66 टक्के निकाल लागला.त्यापैकी 27 विद्यार्थ्यांना ‘ए’ग्रेड तर 41 विद्यार्थ्यांना ‘बी’ ग्रेड प्राप्त झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल,सचिव अॅड.रवींद्र जैन,मुख्याध्यापक नरेंद्र भावे,वासंती नागोरे यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ,शिक्षकवृंद,पालकवृंद व विद्यार्थी यांनी केले. ‘ए’ ग्रेड प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे – लिपिका सचिन पाटील,गौरी किशोर भालोदकर,मयंक भूषण भाट,तेजल दीपक भावसार,भक्ती रवींद्रकुमार पाटील,अंशुल दिनेश पोतदार,अनिषा महेंद्र पाटील,तेजस्विनी गजानन पाटील,रोहन सुनील पाटील,तन्वी नितीन पाटील,मानसी मनोज सोनार,क्रीतिका बडगुजर,श्रुती बाविस्कर,हर्षदा दत्तात्रय पाटील,पवन शशिकांत शिंदे,खुशी शशिकांत शिंदे,विधी अनिल जैन,चैताली विजय पाटील,हर्षिता सचिन बडगुजर,दर्शन जयेश चौधरी,जागृती प्रवीण महाजन,साक्षी किशोर पाटील,निखिल ज्ञानेश्वर पाटील,अश्विनी प्रवीण पाटील,जान्हवी महेंद्र साळी,आस्था दिपक साळुंखे,जान्हवी राजेंद्र विंचुरकर.