महाराष्ट्र 9

चोपड्यात ३१ जानेवारीपासून चार दिवसीय रोटरी उत्सवाचे आयोजन*सहप्रांतपाल प्रसन्न गुजराथी यांच्या हस्ते व रोटरी सदस्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन *

[espro-slider id=13780]

चोपड्यात ३१ जानेवारीपासून चार दिवसीय रोटरी उत्सवाचे आयोजन

चोपडा – येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी, ग्राहक आणि उत्पादक यांच्यात दुवा साधण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या रोटरी उत्सवाच्या जागेचे भूमिपूजन दि. २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक ३०३० चे माजी सहप्रांतपाल प्रसन्न गुजराथी यांच्या हस्ते व रोटरी सदस्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.         याप्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रोटरी क्लब ऑफ चोपडाचे माजी अध्यक्ष आशिष अरुणलाल गुजराथी यांनी रोटरी उत्सवाची त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. यावल रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात बिजनेस स्टॉल, फूड स्टॉल, अम्युझमेंट पार्क असे विविध गृहोपयोगी उत्पादने, ऑटोमोबाईल व खाद्यपदार्थांचे सुमारे १७० स्टॉल्स असणार आहेत. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तसेच शेती विषयक मार्गदर्शनासाठी याठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. याप्रसंगी रोटरी उत्सवाच्या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.       याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष नितीन जैन, सचिव धीरज अग्रवाल, रोटरी उत्सव चेअरमन नितीन अहिरराव, को-चेअरमन चेतन टाटिया, स्टॉल कमिटी चेअरमन अविनाश पाटील, प्रोजेक्ट ट्रेझझर संजीव गुजराथी, अनिल अग्रवाल, सहप्रांतपाल विलास पाटील, माजी सहप्रांतपाल एम. डब्ल्यू. पाटील, माजी अध्यक्ष पुनम गुजराथी, विनोद अग्रवाल, रुपेश पाटील यांच्यासह रोटरी सदस्यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]