चोपडा आगारात इंधन बचत मोहिमेला सुरुवात
चोपडा आगारात इंधन बचत मोहीमेचे उद्धाटन

चोपडा (प्रतिनिधी ) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात इंधन बचत मोहीमेचे उद्धाटन करण्यात आले दि.१६/०१/२०२० ते १५/०२/२०२० अशी महिनाभर राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने चोपडा आगारात इंधन बचतीवर एक विशेष कार्यक्रम आगार व्यवस्थापक .संदेशजी क्षिरसागर यांच्याकडुन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, वेले येथील नामांकित शिक्षक व हभप जाधव सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच आगारातील अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक त्याच पद्धतीने चालकाने मनावर घेतले तर काहीही शक्य आहे हे सरांनी विविध उदाहरणांनी स्पष्ट करुन सांगितले व मोलाचे मार्गदर्शन केले. यासोबतच ज्या चालकांनी सन २०१९-२० मध्ये चांगले KPTL आणले त्यांचे आगार व्यवस्थापक संदेशजी क्षिरसागर व सुरक्षा दक्षता अधिकारी सोळंकी यांच्याकडुन गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर महाजन यांनी केले. यावेळी अनिल बाविस्कर, डि डि चावरे, डि एस काटे, एम एम भालेराव, भगवान नायदे, शामभाऊ धामोळे, कुंदन बोरसे, रशिद शेख , संदिप तायडे, महेंद्र बिवालकर सह चालक वाहक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
