ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील दंतवैद,डॉ. वाल्मिक पाटील बालरोगतज्ज्ञ, डॉ. तृप्ती पाटील नेत्ररोगतज्ज्ञ आणि शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी मॅडम उपस्थित होते. आरोग्य शिबिरात प्रत्येक विद्यार्थ्याचे संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात आली,ज्या विद्यार्थ्यांना काही शारीरिक अडचण होत्या अशा सर्वांना उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले,या शिबिरात डॉ राहुल पाटील यांनी दंत व मुखरोग तपासणी, डॉ वाल्मिक पाटील यांनी सर्वांगीण तपासणी व डॉ तृप्ती पाटील यांनी नेत्र तपासणी केली यावेळी डॉ. वाल्मिक पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याची काळजी कशा पध्दतीने घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केले,डॉ. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना अती चॉकलेट आणि जास्त गोड पदार्थ खाल्याने आपल्या दातांवर काय परिणाम होतात हे सांगितले तसेच डॉ. तृप्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अती वापरामुळे आपल्या डोळांवर काय परिणाम होतात यासंदर्भात माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.