महाराष्ट्र 9

सैनिक किरण पाटीलांचे सेवापूर्ती सोहळ्यात माणूसकीचे दर्शन..! *राजमुंद्रा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम,नेहरू वसतीगृहास साहित्य भेट*

[espro-slider id=13780]

सैनिक किरण पाटीलांचे सेवापूर्ती सोहळ्यात.. माणूसकीचे दर्शन..! राजमुंद्रा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम.. नेहरू वसतीगृहास साहित्य भेट


चोपडा दि.(प्रतिनिधी ) : – अमळनेर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजमुंद्रा फाउंडेशन तर्फे भारतीय सैन्यदलाचे देशसेवक किरण जयवंतराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त चोपडा येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थीनींना ब्लॅक बोर्ड, तांदूळ व बिस्कीट पेट्या वाटप करून नवा आदर्श समाजापुढे ठेवला. शिवाय अमळनेर तालुका सैनिक संघटनेला पाच हजारांचा धनादेश देऊन सैनिकी पेशेला मदतीची फुंकर घालत समाज कल्याणाची ज्योत तेवत ठेवाण्याचा प्रकाशमय सोहळा अन्नदानाने उजळून निघाला.
राजमाता माॅं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत सैनिक किरण पाटील यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचे चित्र पालटून कृतज्ञता सोहळ्यात रूपांतर करत त्रिवेणी संगमाचा योग घडवून आणणारे सामाजिक कार्याकर्ते नगरसेवक शामकांत पाटील यांनी समाजातील गरजवंत घटकांना सहयोग देऊन राजमुंद्रा फाउंडेशनच्या कार्याचा आरसा चकचकीत करत जनमानसात मानवतेची प्रतिमा कोरून सोहळ्यास भावस्पर्शाची किनार जोडली.
कार्यक्रमास आ.स्मिताताई वाघ,माजी आ.शिरिष चौधरी, कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील, पोलीस निरीक्षकअंबादास मोरे,न.पा.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गायकवाड, सेवानिवृत्त पुरवठा अधिकारी जयवंतराव पाटील,सौ.छायाताई जयवंतराव पाटील,गणपुरचे सरपंच भालेराव पाटील, नगरसेवक शामकांत पाटील, प्रशांत पाटील, डॉ.हेमराज पाटील, सुभेदार योगीराज पाटील, वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ,राजेंद्र यादव,भीरू पाटील,दयाराम पाटील, अनिल बोरसे,अक्षय चव्हाण, किरण सुर्यवंशी, आशिष पवार,छोटू जैन, योगेश मुंदडा,भरत ललवाणी,बाळू कोठारी, प्रदीप अग्रवाल,विजय पाटील, नाना पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]