चोपड्यातील वेश्यावस्तील अतिक्रमणावर भल्यापहाटे संक्रांत,पत्र्याचा शेडच्या तीस घरे केली भुईसपाट
चोपडा:-

येथील चोपडा धरणगाव मार्गावरील पाटबंधारे कालवणाची कसलेले अतिक्रमण आज सकाळी पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त केले भल्या पहाटे झालेल्या कारवाईने अतिक्रमित वेश्या व्यवसायिक महिलांसह त्यांच्या परिवाराची धांदल उडाली या महिला उघड्यावर पडल्याने आता कुठे जायचे? असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे
याबाबत वृत्त असे की चोपडा शहराबाहेर धरणगाव रस्त्यावर उजव्या कालव्याची पाटचारी आहे या पाटचारी गेल्या कित्येक वर्षापासून वेश्याव्यवसाय सुरू होता चोपडा शहरास आजूबाजूच्या परिसरातून कित्येक आंबट शौकीन या ठिकाणी येऊन आपली हौस पूर्ण करून घेत होते आज सकाळपासून अचानक पाटबंधारे विभागाने या ठिकाणी असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुरुवात केल्याने मोठी परिसरात खळबळ उडाली जवळपास दहा हजार चौरस फूट एवढ्या मोठ्या जागेवर अतिक्रमण होते प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात या कारवाईस सकाळी सुरुवात झाली होती या अतिक्रमणधारकांना पाटबंधारे विभागाकडून वेळोवेळी नोटीस व सूचना देण्यात आल्या होत्या मात्र संक्रांत सणाच्या तोंडावर झालेल्या कार्यवाही वर अतिक्रमण व्यवसायिक महिलांना आपला रोष प्रशासनावर व्यक्त केला आहे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता पी बी पाटील शाखा अभियंता टी आर सोनवणे कालवा निरीक्षक पी एम पाटील व त्यांच्या पथकाने या कार्यवाहित सहभाग घेतला. ही कार्यवाही बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी याठिकाणी जमलेली होती

