महाराष्ट्र 9

लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे आनंद मेळावा उत्साहात साजरा

[espro-slider id=13780]

लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे आनंद मेळावा उत्साहात साजरा


चोपडा:-(प्रतिनिधी) ————
तालुक्यातील जुन्या शिरपूर रोड शेजारील लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .
कडाक्याची थंडी असतानाही बाल आनंद मेळाव्यासाठी सकाळी शाळांमध्ये बालगोपालांच्या किलबिलाटाने लिटिल हार्ट इंग्लिश मिडीयम शाळेत उत्साही अन आनंदी वातावरण निर्माण झाले होते. बालगोपालांनी गटा-गटाने बैठक मारत वेगवेगळ्या वेशभूषांनी स्वता:ला सजवले होते. दरम्यान शाळेच्या आवारात वेगवेगळ्याप्रकारचे स्टॉल लावले. कुणी भेळ, चॉकलेट, पाणीपुरी, भाजीपाला, शुभेच्छाकार्ड, सह, गोळ्या बिस्कीट, विविध प्रकारच्या वस्तु विक्रीस बालगोपाळ सज्ज झाले होते. व्यवहारिक ज्ञानाचे कृतीशील शिक्षण मिळणार असल्याने बालगोपालांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद अन उत्सुकता झळकत, वेगवेगळ्या वेशभूषांनी सजलेले बालगोपाळ लक्ष वेधून घेत होते.


बाल आनंद मेळाव्यात उभारलेले विविध वस्तुंचे विक्रीच्या स्टॉलमधून व्यवहारिक ज्ञानाची निर्मिती होते. बालगोपालांना खरेदी विक्रीचा मिळणारा आनंद निराळाच असतो , जमा खर्चाचा ताळेबंदाचे ज्ञान मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर निर्माण होणार आनंद विलक्षण अनुभूती देणारा दिसुन येत होता. विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते संगीत खुर्ची, लिंबू चमचा, धावणे, खोखो विविध खेळाचा मुलांनी आनंद घेतला. तसेच विविध अन्नपदार्थाचा आस्वादही घेतला.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रताप विद्यामंदिर चे माजी शिक्षक सुधिर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमर संस्थेचे सचिव दिपक जोशी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते.बालमोहन उच्चमाध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक विजय दीक्षित बालमोहन उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या प्रीती पाटील लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका उत्कर्षा जोशी व लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल चे दुपार विभागाचे मुख्याध्यापक संजय खैरनार हे यावेळी उपस्थित होते.यांच्या सह विदयार्थी, विदयार्थीनी, शिक्षक, शिक्षिका महिला सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते….

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]