महाराष्ट्र 9

सुवर्ण महोत्सवाच्या “चोपडा रन” मध्ये सी.आर.पी.एफ.जवान प्रथम

[espro-slider id=13780]

सुवर्ण महोत्सवाच्या “चोपडा रन” मध्ये सी.आर.पी.एफ.जवान प्रथम

चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडाच्या ‘सुवर्ण महोत्सवी वर्ष- २०१९-२०’ च्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात “चोपडा रन” या खुल्या तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन दिनांक ९ रोजी करण्यात आलेले होते.


डॉ.मनोज पाटील (वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय ,चोपडा), ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस.डी.पाटील यांच्या हस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील, सर्व शाखांचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला महाविद्यालयाच्या प्रागंणातून ध्वज फडकावून सुरुवात करण्यात आली. ही स्पर्धा १६ ते ३० वयोगट मुले व मुली तर ३० वर्षावरील पुरुष व महिला अशा चार गटात आयोजित करण्यात आली होती. मॅरेथॉनचा मार्ग पुरुष व मुलांसाठी महाविद्यालय मैदानापासून आडगाव पर्यंत व आडगाव पासून परत महाविद्यालय मैदानांपर्यंत असा १० कि.मी. तर महिला व मुलींसाठी ५ कि.मी. अंतराचा होता.
या स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम पारितोषिक दिनेश भाया वसावे (आर.सी.पटेल महाविद्यालय, शिरपूर), द्वितीय पारितोषिक गीनेश जीऱ्या वळवी

(आर.सी.पटेल महाविद्यालय, शिरपूर) तर तृतीय पारितोषिक सुनील कुमार रामवीरसिंग (नाशिक) यांनी
पारितोषिके प्राप्त केली. मुलींच्या गटात प्रथम पारितोषिक अनिता तेरसिंग भिलाला (नूतन मराठा महा. जळगाव), द्वितीय पारितोषिक तेजस्विनी राजेंद्र पाटील (कला,शास्त्र व वाणिज्य महा. चोपडा) तर तृतीय पारितोषिक सोनाली काशिनाथ माळी (कला,शास्त्र व वाणिज्य महा. चोपडा) यांनी पारितोषिके प्राप्त केली. पुरुष गटात प्रथम पारितोषिक शेख मोहसीन शेख निसार (सी.आर.पी.एफ. जवान अहमदाबाद), द्वितीय पारितोषिक मोतीराम बियानसिंग पावरा (कला,शास्त्र व वाणिज्य महा. चोपडा) तर तृतीय पारितोषिक प्रा. विजय भाईदास शिंदे (नवलनगर महाविद्यालय) यांनी पारितोषिके प्राप्त केली. महिला गटात प्रथम पारितोषिक सौ.लता मुकेश चौधरी (ऑक्सफर्ड स्कूल चोपडा), द्वितीय पारितोषिक सौ.अनिता नंदकिशोर सांगोरे (कला,शास्त्र व वाणिज्य महा. चोपडा) तर तृतीय पारितोषिक सौ.दिपाली संतोष पाटील (कला,शास्त्र व वाणिज्य महा. चोपडा) यांनी पारितोषिके प्राप्त केली. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी सौ. जयश्री अनिल पाटील (जि.प.सदस्या, जळगाव), संस्थेच्या सचिव डॉ. सौ.स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, सर्व विद्याशाखांचे प्राचार्य व उपप्राचार्य, समिती प्रमुख व सदस्य आदि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. त्यात बक्षिसांचे स्वरूप अनुक्रमे प्रथम – ५०००/- द्वितीय ३०००/- तृतीय २०००/- असे होते. या स्पर्धेमध्ये एकूण मुले-७०, मुली- १८८, पुरुष-४७ व महिला- ३८ असे एकूण ३४३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत चोपडा, शिरपूर, जळगाव, धुळे, नाशिक व अहमदाबाद येथील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती प्रमुख प्रा.सौ.क्रांती क्षिरसागर व सर्व समिती सदस्य, कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. शैलेश वाघ तर पारितोषिक वितरण प्रसंगी प्रा. एस. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
या स्पर्धेप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या अंतर्गत सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक बंधू-भगिनी, विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधुभगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]