महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचा महाकलाउत्सव

चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच दिनांक 10 जानेवारी 13 जानेवारी दरम्यान महाकला उत्सव या भरगच्च सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. असे पत्रकार परिषदेत महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.श्री संदीप पाटील,सचिव डॉ. स्मिताताई पाटील,सहसचिव तथा प्राचार्य डॉ.श्री डी. ए. सूर्यवंशी यांनी कळविले आहे.पत्रकार परिषद संस्थेच्या मुख्य कार्यालयात दुपारी 4 वाजता संपन्न झाली.
शुक्रवार दिनांक 10 रोजी सकाळी आठ ते दहा वाजे दरम्यान उद्घाटन होईल. चोपडा येथील तहसिलदार अनिल गावीत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक १० रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत माजी आमदार दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील जिल्हास्तरीय कनिष्ठ आंतरमहाविद्यालयीन वकृत्वस्पर्धा, सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान आनंद मेळावा, सायंकाळी पाच ते सात वाजे दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक ११ रोजी सकाळी आठ ते दहा वाजे दरम्यान शेलापागोटे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर सकाळी दहा ते चार वाजे दरम्यान माजी शिक्षण मंत्री स्व.अक्कासाहेब सौ. शरदचंद्रिका सुरेश पाटील राज्यस्तरीय वरिष्ठ आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहे. तसेच सायंकाळी चार ते सात वाजे दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दहा वाजे दरम्यान संगीत शेलापागोटे यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता मॉसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त डॉ. हेमंत नरेंद्र पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी चार ते सात वाजे दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच दिनांक 13 रोजी सकाळी आठ ते दहा वाजे दरम्यान चित्रकला स्पर्धा, हास्य काव्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा, कथाकथन, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा व सायंकाळी चार वाजता समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल.तसेच कला,शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली रंगबावरी ही एकांकिका सादर केली होती त्यास जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार व पुरुषोत्तम करंडक प्राप्त झाला आहे.तसेच या एकांकिकेत बाळू या पात्रास राज्यस्तरीय असा उत्कृष्ठ अभिनय पुरस्कार प्राप्त झाला आहे.ही एकांकिका ही दिनांक 13 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार असून सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. संदीपभैय्या सुरेश पाटील व सचिव डॉ.स्मिताताई पाटील आणि सहसचिव तथा प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले आहे.