महाराष्ट्र 9

भारतीय पत्रकार संघातर्फे चोपडा येथे पत्रकार दिन सोहळा *इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम वृत्तपत्रांची विश्वासार्हता मिटवू शकत नाही- विवेक*

[espro-slider id=13780]

भारतीय पत्रकार संघातर्फे चोपडा येथे पत्रकार दिन सोहळाइलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम वृत्तपत्रांची विश्वासार्हता मिटवू शकत नाही- विवेक

देशपांडे चोपडा (प्रतिनिधी),आजच्या धकाधकीच्या काळात इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम वृत्तपत्रांची विश्वासार्हता मिटवू शकत नाही, त्यासाठी फक्त वृत्तपत्रांचे प्रतिनिधी अभ्यासू असले पाहिजेत. निखील वागळे,उदय निरगुळकरांसारखे पत्रकार वृत्तपत्रात काम करायचे नंतर ते चॅनलवर गेले,आता त्यांचे काय झाले? असा सवाल करतांना आजही वृत्तपत्राचे महत्व कमी झालेले नाही असे प्रतिपादन नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांनी केले. ते भारतीय पत्रकार महासंघाच्यावतीने आयोजित  पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.


 शहराबाहेरील जयेश लॉन्सवर ६ जानेवारी पत्रकार दिनी भारतीय पत्रकार महासंघ आयोजित कार्यक्रमात देशपांडे यांनी ‘वृत्तपत्र आज काल आणि उद्या’ या विषयावर चोपडेकरांशी मनमोकळा संवाद साधला. इलेक्टॉनिक माध्यमांनी समाजाला काय दिले? याचाही समाचार घेतांना श्रीमंतांच्या हातचं बाहुलं होत चाललेल्या विविध वाहिन्यांच्या स्पर्धेत वृत्तपत्रे कशी टिकतील याबाबतची तुलनात्मक रचना त्यांनी मांडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे म्हणाले की, जळगावचे जनशक्तीचे स्व.ब्रिजलालभाऊ पाटील, बातमीदारचे नानासाहेब नेहेते यांनी पत्रकार कार्यकर्ते घडविले. नाशिकच्या दादासाहेब पोतनीसांचा गावंकरी अक्षरजुळणीच्या काळात वृत्तपत्रांमधील चुका मुद्राराक्षसाचा विनोद या माध्यमातून स्पष्ट लिहायचे. कार्यकर्ते घडवले, वृत्तपत्रांनी नस ओळखली म्हणून संघर्ष करतांना ५ वेळा मलाही तुरुंगात जावे लागले. वृत्तपत्र असे सांगून वृत्तपत्रांनी देखील केवळ जाहिरातीच्या मागे न लागता आपले अस्तित्व कसे टिकून राहिल याचा विचार करावा असेही दाणे यांनी सांगितले.ईशस्तवन व स्वागत गीतानंतर सरस्वतीपूजन आणि कै.बाळशास्त्री जांभेकरांच्या भव्य तैलचित्राचे माल्यार्पण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर भारतीय महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत, केंद्रीय सचिव प्रदिप पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष राकेश कोल्हे, संपादक नरेंद्र चौधरी,कार्यक्रमास चोपडा पंचायत समितीच्या सभापती कल्पना पाटील, शेतकी संधाचे प्रेसिंडेट एल.एन.पाटील,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष हेमंत पाटील, राजेश जैन, प्रकाश सरदार, शकील पटेल, जिल्हास्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्राप्त छनालाल भिला वाडिले, सागर ओतारी, चंद्रमणी वाघ, राजेंद्र ढवळे, किसनराव थोरात आदींचे स्वागत व सत्कार ज्येष्ठ पत्रकाररमेश जे.पाटील, जिल्हाध्यक्ष विलास पाटील, शहराध्यक्ष नंदलाल मराठे,शशिकांत राजवैद्य तुषार सुर्यवंशी,मच्छिद्र रायसिंग,राकेश पाटील छोटु वारडे  यांची विशेेष उपस्थिती  होती. भारतीय पत्रकार महासंघाच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विलास पाटील यांच्या पुनर्नियुक्तीची व ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांची जळगाव जिल्हाध्यक्ष(शहरी)पदाच्या नियुक्तीची घोषणा यावेळी करण्यात आली पत्रकार व कवी रमेश पाटील यांनी आपल्या ‘नांगरफाळ’या काव्यसंग्रहाची भेट प्रत मान्यवरांना दिली.प्रास्ताविक रमेश पाटील यांनी तर सुत्रसंचलन राधेश्याम पाटील यांनी केले. पंकज पाटील, तृप्तीताई पाटील यांनाही यावेळी गौरविण्यात आले.शहर व तालुक्यातील शेकडो निमंत्रीत मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. सन्मानार्थींचा सत्कारया प्रसंगी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे सन्मानार्थी आशाताई गवरे, चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, चोपडा नगरपरिषदेतील गटनेते जीवनभाऊ चौधरी, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, कवि व साहित्यीक  अशोक सोनवणे, निवृत्त मंडळ अधिकारी अमृतराव वाघ आदींना सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]