महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील रुखणखेडा झन्ना मन्ना खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई,दोन लाख चोवीस हजार पाचशे साठचा मुद्देमाल जप्त *ग्रामसेवक सह आठ जणांना घेतले ताब्यात*

[espro-slider id=13780]

चोपडा तालुक्यातील रुखणखेडा झन्ना मन्ना खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई,दोन लाख चोवीस हजार पाचशे साठचा मुद्देमाल जप्त

ग्रामसेवक सह आठ जणांना घेतले ताब्यात

चोपडा(प्रतिनिधी) सचिन जायसवाल
दि ५रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून रुखणखेडा तालुका चोपडा येथील प्लॉट भागात संजय गोविंदा भील यांच्या पत्र्याचा शेडचा शेजारी सार्वजनिक जागी  जुगार खेळणाऱ्यांवर शहर पोलिसांनी धाड टाकत नऊ जणांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून दोन लाख चोवीस हजार पाचशे साठचा मुद्देमाल पोलिसांकडून जमा करण्यात आला.
  चोपडा तालुक्यातील रुखणखेडा भागात स्वतःच्या फायद्यासाठी मांग पत्त्यांचा झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना  संजय गोविंदा मोरे(४६)रा.रुखणखेडा, संजय मुलचंद (३४) रा नारद ता.चोपडा,परेश दामोधरदास गुजराथी(५२) रा.गुजराथी गल्ली,चोपडा, राहुल विश्वनाथ अग्रवाल (३६) रा.गांधी चौक चोपडा, जितेंद्र आनंदा मोरे(३५) रा. वेले ता.चोपडा,कृष्णकांत राजाराम सपकाळे(४३)ग्रामसेवक रा. बोरोले नगर चोपडा,अंकुश साहेबराव भील(३७) रा.रुखणखेडा,कृष्णा बळीराम पाटील (५५)रा.नारद ता.चोपडा,यशवंत नारायण जाधव (४2) रा.अरुण नगर चोपडा,यांना घटनास्थळीहुन अटक करण्यात आली.यावेळी पोलिसांना रोख रक्कम ६४५६० ,मोबाईल,चारचाकी वाहनांसह दोन लाख चोवीस हजार पाचशे साठचा  मुद्देमाल मिळून आला.सदर कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे ,  प्रमोद मांगिलाल पवार ,पोना विलेश सोनवणे,पोकॉ प्रभाकर मंगा कंखरे, पोकॉ प्रकाश देवसिंग मथुरे धनगर यांनी केली.दाखल  फिर्यादीवरून सात  जणांवर जुगार प्रतिबंधक अधिनियम मुंबई जुगार अक्ट कलम १२(अ)प्रमाणे कार्यवाही येऊन पुढील तपास शहर पोलीस करीत  आहेत

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]