पक्षीमित्राने वाचवले एका पक्षाचे प्राण

चोपडा (प्रतिनिधी ) येथील विवेकानंद विद्यालय,चोपड़ा येथील उपशिक्षक हेमराज पाटील सर शिक्षण क्षेत्रात आपले योगदान एक दशकाहुन अधिक काळापासून यशस्वीपणे देत आहेत त्या सोबतच, सर काही वर्षांपासून पर्यावरणाचे भान राखत पक्षी निरीक्षण, संशोधन आणि पक्षी संवर्धन क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्यरत आहेत. काल रात्री 2 जानेवारी गुरुवार रोजी पवार नगर येथील रहिवासी शाळेची विद्यार्थिनी प्रतीक्षा ज्ञानेश्वर पाटील हिला व परिवाराला एक कावळा जखमी अवस्थेत आढळला, प्रतिक्षा हिने सरांना फोन केला आणि सर तातडीने हजर झाले आणि त्यांनी कावळ्यावर प्रथमोपचार करुन त्याचे प्राण वाचवले. या कार्यामुळे त्यांचे कॉलनी परिसर सर्व पक्षीमित्र विद्यालयातील मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद पालक वृंद व विद्यार्थी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
