चोपड्याच्या सौ. शशीकला राजकुमार विसपुते निबंध स्पर्धेत प्रथम…

चोपडा ( प्रतिनिधी ) नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्था, नाशिक (नोंदणीकृत संस्था) आयोजित राज्य स्तरीय निंबध स्पर्धेत चोपड्याच्या सौ. शशीकला राजकुमार विसपुते यांचा प्रथम क्रमांक आला. निंबधांचा विषय वधू वर मेळाव्याची सामाजीक गरज असा होता. त्यासाठी अहिर सुवर्णकार समाजाची शान प्रसिध्द नाट्य व सिनेकलाकार मृणालीनी दुसानीस यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार या वर्षांच्या २२वा वधूवर पालक मेळाव्यात दि.२९ डिसेंबर २०१९ रविवार रोजी सकाळी १०वा.कर्मविर दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका, नाशिक येथे करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल त्याचे खुप खुप अभिनंदन व कौतुक