उत्तम शिक्षक नसतील तर शाळेच्या उंच इमारती देखील बिनकामाच्या– दिव्य मराठीचे संपादक त्रंबक कापडे याचे चोपडयात प्रतिपादन

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा सारख्या ठिकाणी उत्तम शिक्षणाची दारं उघडण्याचे काम पंकज समूहाच्या माध्यमातून करण्यात आले असून ,उत्तम शिक्षण दिल्यावरच प्रत्येक ठिकाणी यशाच्या चढत्या कमानी दिसून येतात, शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्तम शिक्षक नसतील तर त्या शाळेच्या इमारती देखील बिनकामाच्या असतात असे प्रतिपादन जळगाव दिव्य मराठीचे निवासी संपादक त्र्यंबक कापडे यांनी बोलताना सांगितले.

शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे पंकज विद्यालयात सालाबादाप्रमाणे यंदाही ‘रंग-तरंग २०१९’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि २३ रोजी दुसऱ्या दिवशी या सत्राच्या उद्घाटनासाठी दिव्य मराठीचे निवासी संपादक त्र्यंबक कापडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.
यावेळी त्र्यंबक कापडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले,भागवत भारंबे,गोकुळ भोळे,हेमलता बोरोले,
दीपाली बोरोले,पंकज विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प स उपसभापती एम व्ही पाटील,माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक व्ही आर पाटील,पंकज ग्लोबल स्कुल चे प्राचार्य मिलिंद पाटील,
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा किशोर पाठक, पंकज इंग्लिश मिडीयम स्कुल चे प्राचार्य नीता पाटील,रेखा पाटील आदी उपस्थित होते.
*विशेष सत्काराचे आयोजन:- दुसऱ्या दिवशी पंकज विद्यालयाच्या या सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्य मराठी चे निवासी संपादक त्र्यबक कापडे याच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षा व पंकज स्कॉलर परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या वेगवेगळ्या वर्गातील शेकडो मुलाचे सत्कार यावेळी करण्यात आले होते.
तसेच विद्यालयातील शिक्षकांचा देखील त्याच्या हस्ते गौरव करण्यात आले होते.
तंबाखू मुक्त शाळेचे प्रमाणपत्र वाटप:–
दिव्य मराठीचे संपादक त्र्यबक कापडे याच्या हस्ते पंकज विदयालयाला तंबाखू मुक्त शाळा झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील,पंकज इंग्लिश मेडीयम स्कुल च्या मुख्याध्यापिका नीता पाटील यांना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी तंबाखू मुक्त नियंत्रण जिल्हा समितीचे सदस्य राज मोहम्मद शिकलकर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे उद्घाटक दिव्य मराठीचे संपादक त्र्यबक कापडे यांनी बोलताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात विविध स्पर्धा परिक्षामध्ये जर पंकज विदयलयाचे निम्मे मुलं येत असतील तर ही बाब गौरवास्पद आहे.भविष्यातील स्पर्धा परीक्षांचे निकाल जेव्हा जेव्हा लागतील तेव्हा होणाऱ्या अधिकारया मध्ये पंकज विध्यालयातून पुढे आलेले विध्यार्यां निश्चित सापडतील.लोकसेवा आयोगाच्या तयारी करण्यासाठी पंकज स्कॉलर सारख्या परीक्षांची तयारी पंकज विद्यालयात केली जात असून संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले,संचालक पंकज बोरोले यांनी तश्या मेरिट चे शिक्षक या ठिकाणी घेतले आहेत.
चोपडया सारख्या ठिकाणी उत्तम शिक्षणाची दारं त्यांनी उघडली असून बालसंस्कार केंद्र पासून ते वरिष्ठ महाविद्यालयापर्यत चे शिक्षण एकच इमारतीत असून या गोष्टीचा फायदा मुलानी घ्यावा असे आवाहन देखील यावेळी त्र्यबक कापडे यांनी केले होते.
रंगतरंग सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विध्यार्थी आपल्या कला गुणांचे वाव दाखवून त्यातून आत्मविश्वास वाढवत आहेत.आत्मविश्वास वाढला की विध्यार्यांचा विकास होतो असेही श्री कापडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत पाटील यांनी केले.
