महाराष्ट्र 9

भारतीय जैन संघटनेत समस्या सांगणारा कार्यकर्ता नको तर समस्यांचे समाधान कारणांना कार्यकर्ता पाहिजे — राजेंद्रजी लुंकड

[espro-slider id=13780]

भारतीय जैन संघटनेत समस्या सांगणारा कार्यकर्ता नको तर समस्यांचे समाधान कारणांना कार्यकर्ता पाहिजे — राजेंद्रजी लुंकड


चोपडा ( प्रतिनिधी ) — भारतीय जैन संघटना ही एक संस्था नसून विचार आहे ह्या विचारांच्या माध्यमातून समाजासह देशवासियांसाठी अनेक नवनवीन विचार घेऊन समाजभिमुख कार्य करत असते चांगले विचार अंगी असले तरच आपण कोणत्याही सामाजिक काम करू शकतो भारतीय जैन संघटनेत काम करायला मिळणे म्हणजेच एक भाग्याचे लक्षण आहे या संघटनेत अप्रत्यक्षपणे पुण्य चे कार्य आपण करू शकतो त्यामुळे भारतीय जैन संघटनेत समस्या सांगणारा कार्यकर्त्यां पेक्षा समस्यांचे निवारण करणारा कार्यकर्ता हवा असे परखड मत राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड यांनी चोपडा येथे दौऱ्याप्रसंगी केले
भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड (तामिळनाडू ) यांच्या महाराष्ट्र दौरा अंतर्गत चोपडा येथे आज दिनांक 23 रोजी सकाळी 12 वाजता बोथरा मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष हस्तीमलजी बबं राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य निरंजनजी जैन सचिव अभयजी सेठीया प्रदेश कार्यकारणी सदस्य विनयजी पारख जिल्हा अध्यक्ष विनोद जैन ज्येष्ठ सदस्य डॉ सुरेश अलीझाड जैन
नगरपालिकेचे गटनेता जिवनभाऊ चौधरी, चोपडा पीपल्स कॉ – बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट चे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी ट्रस्टी आशिष भाई गुजराथी
समाजाचे संघपती गुलाबचंद देसरडा ,तालुकाध्यक्ष क्षितीज चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे ते म्हणाले की भारतीय जैन संघटनेने सुजलाम सुफलाम अंतर्गत पाणी जल निस्सारणाचे काम 2015 व्या वर्षीच हाती घेतले होते आणि त्याची गंभीरता लक्षात घेता 2019 मंत्रीमंडळात जल निस्सारणाचे एक स्वतंत्र विभाग केंद्र सरकारच्या नीती आयोग व राज्य सरकारने केला आहे ही गंभीरता पाच वर्षांपूर्वीच भारतीय जैन संघटनेच्या लक्षात आली होती यासाठी काम अधिक गतिमान करावे अश्या सूचना नितीआयोगाने संघटनेला देण्यात आले आहेत 1993 मधील लातूरच्या भूकंपाचे नियोजन पहाता भारतीय जैन संघटना राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला शिक्षण पद्धत, युवती सक्षमीकरण, बिझनेस डेव्हलपमेंट, जनरेशन गॅप एक समस्या, हॅप्पी होम हॅपी फॅमिली, अशा विविध कार्यक्रमातून भारतीय जैन संघटना प्रत्येक समाजाला नवनवीन शिक्षण देत असते जनरेशन गॅप बाबत बोलताना संवादाचा अभाव असल्याने दिवसेंदिवस हा दुरावा वाढत चालला आहे आणि त्यामुळे वाद-विवादापर्यंत विषय येत असतो, युवती सक्षमीकरणा बाबत बोलताना त्यांनी सांगितले की हजारो संस्था सामाजिक कामात अग्रेसर असतील परंतु युवती सक्षमीकरणाचा विषय फक्त भारतीय जैन संघटना कडेच आहे याचे शासनाने व इतर संस्थांनी हजारो वेळा आपल अनुकरण केलेले आहे आतापर्यंत मागील दोन वर्षात संपूर्ण भारतात सहा लाख युवतींना सक्षमीकरणचे प्रशिक्षण दिले गेले आहे हॅप्पी होम हॅप्पी फॅमिली या कार्यक्रमांतर्गत परिवाराला सोबत ठेवू शकतो बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये व्यापाऱ्यांनी आजच्या आधुनिक युगात प्रमाणे आपला बिजनेस कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिले आहे वरील सर्व आत्मसात करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आपल्या शहरात करावे लागेल यासाठी आमच्या युवा साथीना समाजानेही साथ द्यावी असे मौलिक विचार राजेंद्रजी लुंकड यांनी केले
कार्यक्रमाची सुरवात महिला संघटनेच्या सदस्यांनी नमस्कार महामंत्राने करण्यात आली तदनंतर मान्यवरांचे स्वागत शब्द सुमनांनी करण्यात आले चोपडा पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, डॉ वैभव पाटील लतिष जैन दीपक राखेचा आदिचा सत्कार राजेंद्रजी लुंकड यांच्या हस्ते करण्यात आला नाला खोलीकरण साठी भारतीय जैन संघटना व चोपडा पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचे बाबत मनोगत व्यक्त करताना चंद्रासभाई गुजराथी यांनी सांगितले की यापेक्षा मोठे कार्य आमच्या हाती आपण सोपवावे भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम करू शकतो त्यासाठी आपण विशेष तरतूद करावी व व आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन चोपडा शहराच्या वतीने गुजराथी यांनी केले
प्रदेशाध्यक्ष हस्तीमलजी बबं यांनी आपल्या मनोगतात सांगितले की चोपडा शहरातून विभागीय नेतृत्व सारखे लोक आहेत त्यामुळे मी आपला दौरा जळगाव जिल्ह्यात फक्त चोपडा तालुक्यात लावला येथे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात व स्वयंस्फूर्तीने काम करतात समाजाला एकत्रित करणे मोठ्या जिकरीचे असून देखील येथील युवावर्ग समाजाला एकत्रित करण्याचे काम करत असतात ही गौरवाची बाब आहे
राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य निरंजनजी जैन यांनी अल्पसंख्यांक म्हणून आपणास काय काय फायदे होऊ शकतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तदनंतर तालुक्यातील तपास्वी महिला व पुरुष तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी कमला नेहरू आदिवासी आश्रम शाळेच्या मुलींना भारतीय जैन संघटनेतर्फे वह्या वाटप करण्यात आल्या तसेच सुंदरगडी वर्डी मामलदा नागलवाडी या गावांमध्ये सुजलाम सुफलाम चे काम मोठ्या प्रमाणात झालेल्या असल्याने येथील ग्रामस्थांतर्फे राजेंद्रजी लुंकड यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी अंमळनेर येथून प्रकाशचंद छाजेड डॉ रवींद्र सिंगवी चोपडा येथील मोरेश्वर देसाई डॉ निर्मल टाटिया, विनोद टाटिया, बाबूलाल बोथरा ,नेमीचंदज जैन विकास गुजराथी, उपनगराध्यक्ष हीतेंद्र देशमुख कमलेश जैन , आदि शहरातील मान्यवर उपस्थित होते महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी शांतीलाल कोचर राजेंद्र टाटिया दिनेश लोडाया , विपुल छाजेड, मयुर चोपडा निर्मल बोरा आनंदा अचलिया आदेश बरडीया, श्रेनिक रुणवाल ,आकाश जैन, शुभम राखेचा, जितेंद्र बोथरा ,अभय ब्रम्हेचा ,चेतन दर्डा, नवीन टाटीया, हिरेंद्र साळी, मयंक बरडीया, तसेच महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ सपना टाटीया, सचिव सौ मानसी राखेचा, उपाध्यक्षा सौ मंगला राखेचा त्याच्या सोबत अनेक महिला सदस्यां हजर होत्या आदी कार्यकर्त्यांनी मेहनत केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रास्तविक ,आभार प्रविण ओस्तवाल यांनी केले

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]