२२ डिसेंबर च्या रात्री चोपड्यातही चालल्या रातरागिनी–दिव्य मराठी अभियानात पंकज विद्यालयातील शिक्षिका यांनी घेतला उत्स्फूर्तपणे घेतला सहभाग!!

सचिन जयस्वाल| चोपडा
२२ डिसेंबर म्हणजे सर्वात मोठी रात्र आणि ह्या दिवशी राज्यभरात दिव्य मराठीचा अभियानाला उस्फूर्तपणे चोपडा शहरात देखील पंकज माध्यमिक विद्यालयाच्या वरिष्ठ उपशिक्षिका विजया अनिल पाटील व दिपाली पंकज बोरले यांनी महिलांना एकत्र करून दैनिक दिव्य मराठीच्या वतीने आयोजित अभियानात सहभागी करून घेतले होते.
यावेळी शेकडो महिला एकत्रित पणें यात सहभागी झाल्यात तर अनेक महिला एकटेच अंधारावर मात करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या, यावेळी चोपडा शहरातील पंकज विद्यालय व परिसरात या महिलांनी नाईट वाक करून आम्ही देखील अंधारावर मात करून चालून जाणार असा संदेश देण्याचे काम यावेळी केले होते.

हे अभियान आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून करण्यात यावे असा आग्रह दिव्यमराठी प्रतिनिधी म्हणून प्रवीण पाटील यांनी केल्यानंतर पंकज समूहाचे संचालक पंकज बोरोले व विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील,व्ही आर पाटील यांनी सर्व महिला शिक्षकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व उपस्थित महिलांना यावेळी त्यांनी नाईट वा करा आणि आपण अंधारावर चालून जा असा संदेश देण्याचं आवाहन केल्यानंतर या वेळी आव्हानाला उपस्थित शेकडो महिलांनी देखील दिव्य मराठीचा अभियानाला जोरदार प्रतिसाद देत रात्रीच्या वेळी नाईट वाक केला होता.
**हे अभियान यशस्वी करण्यासाठी माध्यमिक विद्यालयाच्या वरिष्ठ उपशिक्षिका विजया पाटील, पंकज इंग्लिश मेडियम स्कुल च्या मुख्याध्यापक नीता पाटील,वैशाली पाटील, पोर्णिमा भादले,वैशाली किरण पाटील, अलका प्रवीण पाटील यासह सर्व शिक्षक महिलांनी यात सहभागी घेऊन आपला सहभाग नोंदवला होता.
वरिष्ठ उपशिक्षिका विजया पाटील यांनीदेखील विद्यालयातील मुलींच्या व मुलांच्या पालकांना यावेळी नाईट वाक केला होता.त्यावेळी अनेक असंख्य महिलांनी या अभियानात महिला शिक्षकांचा सोबत चोपडा शहरातील शेकडो महिला यात सहभागी झाल्या होत्या. चोपडा शहरात पंकज विद्यालयात व परिसरात या महिलांनी नाईट वाक करून आम्ही अंधारात चालून जाणार असा संदेश या रात्री दिला होता. यावेळी समारोप प्रसंगी आभार दिव्य मराठी चोपडा तालुका प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी मानले होते.
काल सकाळी विजया पाटील,वैशाली पाटील यांच्या टीमने दहावीच्या मुलींच्या मदतीने दिव्य मराठी च्या अभियानात सहभागी होऊन भव्य अशी रांगोळी देखील काढली होती,त्या रांगोळीच्या माध्यमातून नारी शक्ती एकत्र असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला होता
