महाराष्ट्र 9

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चा वार्षिक क्रीडा महोत्सव २०१९ उत्साहात संपन्न

[espro-slider id=13780]

आर्किड इंटरनॅशनल स्कूल चा वार्षिक क्रिडा महोत्सव 2019 उत्साहात संपन्न


यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे आज तिसऱ्या वार्षिक क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी चोपडा नगरपालिकेच्या श्रीमती शोभा देशमुख , प्रा. क्रांती क्षीरसागर-क्रीडा संचालिका,कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय,चोपडा, नगरसेविका सरला शिरसाठ, क्रीड़ा शिक्षक सुधाकर बाविस्कर , संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी मॅडम आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हातून सरस्वती पूजन करण्यात आले, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील आणि प्राचार्या मिस परमेश्वरी यांची प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले, त्यानंतर प्रा. क्रांती यांनी विद्यार्थ्यांना खेळासंबंधी त्यांचे अनुभव सांगून आणि मार्गदर्शन केले, त्यानंतर डॉ. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या बालपणीच्या गोष्टी विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या , त्यानंतर मान्यवरांच्या हातून खेळांना हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते यात फ्रॉग रेस,तीन पायाची शर्यत, जिलेबी रेस, कबड्डी ,

फूटक्रीक ,चॉकलेट रेस, पार्टनर रेस यासारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात रेवा फरहान, सफिया, आराध्या, करमन्य,रेयांश,शौर्या, आयुश , आर्या, पलक,हर्षल ,तन्मय, चक्षिता ,हसनेन,उजेब, सत्यप्रकाश, आदित्य, भूषण, अथर्व, भावेश, वैष्णवी, परी, चेतना, नियती, आर्या या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हातून गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ मेडल देण्यात आली ,यावेळी सर्व पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश वाघ तर आभार प्रदर्शन श्रद्धा देशमुख यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूपच मेहनत घेतली. राष्ट्रीय गीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]