स्मृतिदिनानिमित्त ४१ जणांनी केले रक्तदान,
महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री स्व. शरदचंद्रिका पाटील यांना श्रद्धांजली आठवणींना दिला उजाळा
सर्वपक्षीय नेत्यांसह, अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

चोपडा :–
महाराष्ट्राच्या माजी शिक्षण मंत्री स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांना महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळी सर्वपक्षिय नेत्यांनी,साहित्यिक,शैक्षणिक,सामाजिक,वैद्यकीय,कला क्षेत्रातील यासह इतर राजकीय मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्याच्या स्मृतींना उजाळा ही देण्यात आला.तसेच माजी मंत्री शरद चंद्रिका पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेतील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मिळून ४१ जणांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर डी फार्मसी कॉलेज कडून आयोजित केले होते.

दि. 5 रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार डॉ सुरेशदादा पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड संदीप पाटील, माजी आमदार कैलास पाटील, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी,माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे ,
महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता पाटील,सुषमाताई पाटील,शुभांगी पाटील,सौरभ पाटील, वृषाली पाटील,उपाध्यक्षा आशाताई पाटील, संचालक सुरेश सिताराम पाटील,जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील, माजी सभापती प्रमोद पाटील,चोसाका चेअरमन अतुल ठाकरे,उपाध्यक्ष शशी देवरे, भाजपचे घनश्याम अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रा. नीलम पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुप्रिया सनेर,माजी उपप्राचार्य प्रा. डी. बी. देशमुख, शेतकी संघाचे चेअरमन शेखर पाटील, सुतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील,गटनेते जीवन चौधरी,चोसाका संचालक गोपाल धनगर,विजयाताई पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, पंचायत समिती उपसभापती एम. व्ही. पाटील,माजी सभापती प्रमोद पाटील, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील, शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील,संजीव सोनवणे,सूतगिरणी संचालक शशी पाटील,डॉ. बी. आर. पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक चौधरी,अरुण कंखरे, संजय कानडे, विजयाताई पाटील, उपनगराध्यक्ष हुसेन खा पठाण,डॉ नरेंद्र शिरसाठ, डॉ महेंद्र जैस्वाल,डॉ विनीत हरताळकर, डॉ लोकेंद्र महाजन, डॉ पराग पाटील, नगरसेवक डॉ रवींद्र पाटील, अनिल साठे, मधुकर बाविस्कर, विनायक सोनवणे,डॉ अशोक कदम, अनिल कदम, गोविंदा महाजन, डी बी पाटील, प्रमोद दाजभाउ पाटील, अकबर पिंजारी, ए. टी. पाटील, बाजार समिती संचालक भरत पाटील,चोसाका संचालक आनंदराव रायसिंग, प्रवीण गुजराथी,चहार्डी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील,चोपडा माध्यमिक शिक्षक पतपेढी चे अध्यक्ष विकास शिर्के,न. प. चे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे,पोलीस निरीक्षक विनायक लोकरे,सेना गटनेते महेश पवार,नगरसेवक राजाराम पाटील,कवी अ. नी. सोनवणे,ए. टी. साळुंखे, जिजाबराव सोनवणे,संजीव सोनवणे,ग स संचालक देवेंद्र पाटील,तुळशीराम पाटील,राजू दगा कोळी, महेश शर्मा, राजू शर्मा, तुळशीराम पाटील,

नंदकिशोर सांगोरे, मंगल पाटील,बी. एम. पाटील,सतीश बोरसे, लक्ष्मण पाटील, प्रवीण गुजराथी,मनिष पारिख, डॉ. राहुल पाटील, डॉ. पांडुरंग सोनवणे,सूतगिरणी संचालिका रंजना नेवे, डॉ पराग पाटील, नगरसेविका सुरेखा माळी, सरला शिरसाठ, शोभा देशमुख,नायब तहसीलदार जितेंद्र पंजे,दिलीप नेवे,शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे,किशोर चौधरी,नंदकिशोर पाटील,मंडळाधिकारी अमृतराव वाघ,यांच्यासह सर्व पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते व असंख्य मान्यवरांनी स्मृतीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे सर्व विभागातील प्रमुख व प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी डी फार्मसी एनसीसी एनएसएस तर्फे ४१ जणांनी रक्तदान केले .रक्तदान शिबिर साठी अतुल चौधरी,प्राचार्य श्री आर एन पाटील यांनी व्यवस्था ठेवली. स्मृतिस्थळाची सजावट कलाशिक्षक दिनेश बाविस्कर यांनी तर कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी,मुख्याध्यापक नीळकंठ सोनवणे , डॉ प्रा शैलेश वाघ ,अशोक साळुंखे, दिलीप साळुंखे, प्राचार्य गौतम वडनेरे यांच्यासह इतर विभागातील प्रमुखांनी परिश्रम घेतले.