प्रतिनिधी:चोपडा:भाजपचे नेते घनश्याम अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आज खास त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने १६१ जणांनी रक्तदान केले असून या कार्यक्रमाला सकाळी आठ वाजता डॉ विकास हरताळकर, डॉ विजय पोतदार,ऍड रवींद्र जैन ,उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज पाटील ,भाजप नेते घनश्याम अग्रवाल,सरोज अग्रवाल ,करण अग्रवाल, निधी अग्रवाल,चंदूलाल पालिवाल,पवन अग्रवाल,नगरसेवक गजेंद्र जयस्वाल,चोसाका व्हॉइस चेअरमन शशिकांत देवरे,शशिकांत पाटील, नितीन निकम,प्रवीण पाटील, सागर पठार, मिलिंद पाटील, डॉ मनोज सनेर, विनोद पाटील,यांच्या उपस्थित शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते.

दिवसभरात या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधानसभा माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, अमळनेर चे आमदार अनिल पाटील,माजी आमदार चंद्रकांत सोनवणे,लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील, गटनेते जीवन चौधरी,मनसेचे नेते अनिल वानखेडे,उपनगराध्यक्ष हुसेन पठाण,माजी जी प सदस्या इंदिराताई पाटील,बाजार समिती सभापती जगन्नाथ पाटील,उपसभापती नंदकिशोर पाटील,ऍड जी के पाटील,अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी नगरसेवक ऍड धर्मेंद्र सोनार,आशिष गुजराथी,चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,संचालक सुनील जैन,प स सभापती आत्मराम म्हाळके,उपसभापती एम व्ही पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,भरत बाविस्कर,संजय अग्रवाल,सुभाष अग्रवाल,दगडू अग्रवाल,विक्की अग्रवाल,शेतकरी कृती समितीचे सदस्य एस बी पाटील,डॉ रवींद्र निकम,इंजिनिअर अनिस बोहरी,नारायण पाटील,पंकज बोरोले,राजू बोहरी,कांतीलाल पाटील,हातेड आश्रम शाळेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे,ऍड एस डी सोनवणे,डॉ विनीत हरताळकर,डॉ लोकेंद्र महाजन,डॉ नरेंद्र शिरसाठ,काँगेसचे राजाराम पाटील,अनिल कदम,आर डी पाटील,शशिकांत पाटील,यासह तालुक्यातील राजकीय,सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाने अनोख्या अश्या सामाजिक दायित्व निभावणयाचा कार्यक्रम हाती घेतला त्यात तालुक्यातील १६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून जळगाव सामान्य रुग्णलयाला त्या बाटल्या देण्यात आल्या आहेत.रक्तदान हे पुण्यकर्म असून मित्र मंडळाचा दुसऱ्या वर्ष हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी डॉ विकास हरताळकर यांनी सांगितले की,तालुक्यातील भाजप नेते घनश्याम अग्रवाल व त्याच्या मित्र मंडळाने गेल्या दोन वर्षात सामाजीक कार्याची क्रांती उभी केली आहे.राजकारणापासून लांब राहून जनसेवा करण्याचे पुण्य काम घनश्याम अग्रवाल करत असून पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमात सर्वत मोठं योगदान त्याचे कायम राहील असे काम एका वर्षात उभं केलं आहे.
घनश्याम अग्रवाल यांनी राष्ट्रीय पातळीवर काम करावे-अरुण गुजराथी:–
एकनिष्ठ कोणाला म्हणावे याचे ज्वलत उदाहरण म्हणजे मी पाहिलेले घनश्याम अग्रवाल असून त्यांनी भाजपची खूप सेवा केली आहे.भाजपसाठी त्याचे योगदान फार मोठे असून त्यांनी दिल्लीस्वराची भेट घेऊन चोपडा तालुक्याच्या विकासासाठी मोठं पद घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.