हैद्राबाद येथील डॉ.प्रियंका रेड्डी या तरुणीवर बलात्कार करून तिला ठार मारल्याप्रकरणी काल सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रासह अमळनेरातही त्याचे पडसाद उमटले.

अमळनेरमध्ये विविध संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला.आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याबाबत प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना निवेदनही देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या सुलोचना वाघ यांनी म्हटले की महिलांनी,मुलींनी आता घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असून अशा घटना घडणे लज्जास्पद आहे.म्हणून सदर खटला शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अन्यथा महिला रस्त्यावर उतरून कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत.
यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, तिलोत्तमा पाटील,भारती पाटील,रेणू प्रसाद, राधा नेतले,प्रा.जयश्री साळुंके,सुलोचना वाघ,भारती गाला,योगिता पांडे,विद्या हजारे,आश्विनी भदाणे,वैशाली वानखेडे आदी उपस्थित होते.