दाढी,कटींग केली नाही याचा राग आल्याने नाव्हीच्या मानेवर कैचीने वार : एक गंभीर जखमी : विटनेर येथील घटना : नाभिक समाजाचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

चोपडा ( प्रतिनिधी )—–
दारूच्या नशेत येऊन आताच्या आत माझी दाढी,कटींग कर अशी बतावणी केली परंतु माझेकडे पाहुणे असल्याने सकाळी ये मग करून देईल असे सांगितल्याने त्याचा राग आल्याने एकाने दुकानातील कैची उचलून
नाव्ह्याच्या मानेवर वार करून गंभीर जखमी
केल्याची घटना विटनेर ता.चोपडा येथे काल शुक्रवारी घडली.या घटनेने गावात प्रचंड खडबळ उडाली आहे.याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून,
संबधित आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चोपडा तालुका
नाभिक समाज संघटनेने लेखी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक संदीप आराक यांचेकडे केली आहे.विटनेर येथील रहिवासी मच्छिंद्र रामकृष्ण सैदाणे (वय-२८) याचे गावात सलूनचे दुकान असून,२९ रोजी सलून दुकानात गिऱ्हाईकाची
दाढी करीत असतांना संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रकाश लालचंद कोळी हा दारुच्या नशेत मच्छिंद्र सैंदाणेच्या दुकानावर आला असता त्याने आताच्या आता तू माझी दाढी व
कटींग करून दे असे सांगितले यावेळी सलून दुकान चालक मच्छिंद्र सैंदाणे याने सांगितले की,माझ्याकडे पाहुणे आल्यामुळे मला दुकान बंद करायचे आहे तुझी दाढी व कटींग सकाळी करून देतो परंतू याचा राग आल्याने प्रकाश कोळी याने दारूच्या नशेत सलून दुकानातील ड्रॉवरवर असलेली कैची उचलून सलून चालक
मच्छिन्द्र रामकृष्ण सैंदाणे यांच्या मानेवर उजव्या बाजूला खुपसून गंभीर जखमी केले
यावेळी चंद्रकांत कोळी व शुभम ज्ञानेश्वर सैंदाणे
यांनी आवरा आवर करून मच्छिंद्र सैंदाणे याची
सुटका केली.
याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला मच्छिंद्र रामकृष्ण सैंदाणे रा.विटनेर याच्या फिर्यादी वरून भाग ५ गुरनं.९०/२०१९ भादवि कलम
३२३,३२४,५०४,५०६ प्रमाणे प्रकाश लालचंद कोळी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक
संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. काॅ.नामदेव महाजन करीत आहेत. चोपडा तालुका नाभिक समाज
संघटनेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.
विटनेर येथील घटनेच्या संदर्भात चोपडा
तालुका नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप आराक यांची भेट घेऊन संबधित आरोपीवर कडक कायदेशीर
कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी
निवेदनाद्वारे केली.यावेळी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सैदाणे ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे,दिनेश जगताप, देविदास बाविस्कर,विनोद निकम,ज्ञानेश्वर सैंदाणे, उमाकांत निकम,धनराज पगारे,अरुण सोनवणे यांचेसह सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.