महाराष्ट्र 9

चोपडा – धरणगाव – जळगाव वाहतूक मार्गात आजपासून बदल पर्याय मार्गाने वाहतूक करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आव्हान

[espro-slider id=13780]

चोपडा-धरणगाव-जळगाव वाहतूक मार्गात आजपासून बदल
पर्यायी मार्गाने वाहतुक करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन


जळगाव, दि. 30 – मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्ता राज्यमार्ग-15 कि.मी 86/500 मधील निमगव्हाण जवळील तापी नदी पुलाचे दुरूस्तीचे काम राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. या कामाचा ठेका मे. सॅनफिल्ड इंडिया लिमीटेड, भोपाळ या कंपनीला देण्यात आलेला आहे. पुलाच्या जुन्या बिअरींग बसविणे, नवीन एक्सापान्शन जॉइंट बसविणे आदि बाबींचा समावेश आहे. या कामाची व्याप्ती पाहता प्रत्यक्षात काम करताना पुलाचे गर्डर उचलून नवीन बिअरिंग बसविणे प्रस्तावित असल्याने पुलावरील वाहतुक कमीत कमी एक महिना बंद करणे आवश्यक आहे. तसेच पुलाच्या शेजारुन पर्यायी मार्ग बनविणे अशक्य आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक पर्यायी मार्गावरून कळविणे आवश्यक आहे.
वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे), चोपडा ते अमळनेर, चोपडा ते धरणगाव या तीन्ही मार्गावरून येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या वाहतुकीस रविवार, 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर, 2019 पावेतो सर्व प्रकारची वाहतुक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येत आहे.
चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे) होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी पर्यायी मार्ग चोपड, अडावद, धानोरा मार्ग जळगाव या मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. चोपडा ते अमळनेर दरम्यान होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी चोपडा, हातेड बु. मार्गे तसेच अमळगाव, जळोद मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासठी व जाण्यासाठी वापर करावा, चोपडा ते धरणगाव दरम्यानच्या होणाऱ्या वाहतुकीसाठी नागरीकांनी चोपडा, जळोद, अमळगाव, नांद्री, पातोंडा तसेच चोपडा, हातेड, जळोद, नांद्री, पातोंडा मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]