महाराष्ट्र 9

लासूर येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

[espro-slider id=13780]

लासुर येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील लासुर येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या १२९ पुण्यतिथी निमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा लासुर कार्यकारिणी यांच्या वतीने इयत्ता ८ वी ते १० वी तील विद्यार्थीसाठी दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा माळी समाज मंगल कार्यालय लासुर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक विद्यालयातून २३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.


तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे अध्यक्षस्थानी लासुर ग्राम पंचायत चे लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाचे उदघाटक लासुर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय कोळी व पंचायत समिती चोपडा येथील विस्तार अधिकारी कृषी योगिनी महाजन यांनी केले द्वीप प्रज्वलन महाजन इंग्लिश क्लासेस चोपडा चे संचालक प्रा. दीपक महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख लासुर येथील माळी समाजाचे अध्यक्ष ए के गंभीर,श्रीराम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष हिम्मतराव महाजन,जेष्ठ नागरिक रघुनाथ मगरे,संतोष महाजन,मुरलीधर सोनवणे, नाटेश्वर पीक संरक्षण सो सा चेअरमन गोकुळ महाजन, संचालक जीभाऊ टेलर,माऊली महिला मंडळाचे अध्यक्षा डॉ भावना महाजन,उपाध्यक्षा उज्वला माळी,मार्गदर्शिका माळी समाज विकास मंडळा चे सचिव सुरेश पवार, सह सचिव अरुण महाजन,संचालक भास्कर

महाजन,रमेश महाजन,साखरलाल महाजन,संत सावता महाराज पतसंस्थेचे संचालक हिम्मत माळी सर,लासुर ग्रामपंचायत चे उपसरपंच अनिल वाघ सर,नाटेश्वर पीक संरक्षण सो सा माजी चेअरमन लीलाधर पाटील, माजी व्हा चेअरमन दिनकर पवार, लासुर ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी व्ही के चौधरी तसेच विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी यांनी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा लासुर याचे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजनाचे कार्य कौतुकास्पद आहे.त्याच प्रमाणे विद्यार्थीनी सुद्दा महात्मा जोतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुष यांच्या विचाराचा अभ्यास करून आपल्या जीवनात त्याचे विचार आचरणात आणले पाहिजे असे मत मांडले.
‌ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम येण्याचा मान कु.आसावरी किशोर महाजन प्रताप विद्या मंदिर चोपडा हिने मिळविला असून रु १००१/- रोख बक्षीस व स्मृतीचिन्ह लासुर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भागवत कोळी यांच्या कडून देण्यात आले. व्दितीय क्रमांकाचे बक्षीस कु.कार्तिका विश्वनाथ चौधरी
पंकज विद्यालय चोपडा हिने पटकाविला असून तिला रु ७०१/- रोख बक्षीस स्मृतीचिन्ह पंचायत समिती चोपडा येथील विस्तार अधिकारी कृषी योगिनी किशोर महाजन यांचा कडून देण्यात आले. तृतीय क्रमाकांचे बक्षीस साठी कु.किरण राजेंद्र पाटील विवेकानंद विद्यालय चोपडा हिने पटकाविला असून रु ५०१/- रोख बक्षीस स्मृतीचिन्ह जिल्हा परिषद मुलाची शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष योगेश्वर जयवंत महाजन यांच्या कडून देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीसात मानसी अनिल पाटील या विद्यार्थीला रु १०१ चे रोख बक्षीस डॉ.भावना राजेंद्र महाजन यांनी उत्तेजनार्थ बक्षीसात प्रियंका वासुदेव पाटील
विद्यार्थीला रु १०१ चे रोख बक्षीस तापी फौंडेशन चे संस्थापक अनिल बाविस्कर यांनी दिले. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे मुल्यांकनाचे गोसावी(सर) प्रताप विद्या मंदिर चोपडा, निमगव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल बाविस्कर, चोपडा येथील गोपाल बडगुजर यांनी परीक्षकाचे काम अतिशय पारदर्शक केले.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थीचे क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांचे बद्दल चे विचार ऐकण्यासाठी शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सदर स्पर्धेत उपस्थित विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार माळी समाज विकास मंडळाचे संचालक मास्टर टेलर्स व चहा युवक संघ शाखा लासुरचे उपाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी उपलब्ध करून दिला.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी,चोपडा तालुका उपाध्यक्ष अल्केश महाजन, तालुका सोशल मीडिया समाधान माळी, सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन सर, ए वन क्लासेस चे संचालक राहुल पाटील सर, लासुर शाखा अध्यक्ष नरेंद्र महाजन, शाखा उपाध्यक्ष जितेंद्र माळी, शाखा सचिव भुमेश्वर मगरे, यश महाजन व युवक संघाचे पदाधिकारी मेहनत घेतली तसेच सूत्र संचलन व आभार जितेंद्र सुरेश महाजन खान्देश विभागीय अध्यक्ष श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांनी केले

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]